Iran-Israel conflict : मध्य पूर्व युद्धाचा ३२वा दिवस; इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र

तेहरान : मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३२वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये तणाव कायम आहे. एक महिना उलटल्यानंतरही हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरूच असून सलग ३२व्या दिवशीही स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. मंगळवारी पहाटे इराणने इस्रायलची राजधानी जेरुसलेमवर हल्ला केला, तर इस्रायलने तेहरानमध्ये हल्ले केल्याने तेथील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय लेबनानमध्ये लष्करी कारवाईदरम्यान चार इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला.


इस्फहान प्रांताचे राज्यपाल कार्यालयातील सुरक्षा अधिकारी अकबर सालेही यांच्या हवाल्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात काही लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र नेमक्या ठिकाणांची माहिती त्यांनी दिलेली नाही. नुकसान किती झाले किंवा कोणती जीवितहानी झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्फहान प्रांत हा इराणच्या संरक्षण उद्योगाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे अनेक अणुसंबंधित सुविधा तसेच मोठे लष्करी तळ आहेत, ज्यामध्ये बदर एअरबेस, आठवा फायटर एअरबेस आणि चौथा हवाई दल तळ यांचा समावेश आहे.


अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणच्या अणुस्थळांवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. संयुक्त कारवाईदरम्यान इराणमधील पाच महत्त्वाच्या अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले. अराक, अरदकान, इस्फहान, नतांज आणि बुशेहर या महत्त्वाच्या अणु केंद्रांवर हल्ले झाल्याची माहिती आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्वेमधील संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी वारंवार इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला असला, तरी युद्धाच्या ३२व्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर ते काहीसे मवाळ झाल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी मोहिम चार ते सहा आठवड्यांत संपवण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेला आता मध्य पूर्वेच्या ऊर्जेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने होर्मुझ सामुद्रधुनी उघडल्याशिवायही युद्ध समाप्त करता येईल, असे त्यांचे मत आहे.


दरम्यान, युद्धाच्या ३२व्या दिवशी इराणने जेरुसलेमवर मोठा हल्ला केला. मंगळवारी सकाळी शहरातील किमान १० ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्याची पुष्टी इस्रायली सैन्याने केली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या माहितीनुसार, इराणच्या हवाई दलाने मध्य इराणमधील इस्फहान शहराच्या आकाशात अमेरिकन बनावटीचे MQ-9 रीपर लांब पल्ल्याचे ड्रोन पाडले. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण खाडी देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. याच क्रमात इराणने सौदी अरेबियातील अल-खारज प्रांतावर ड्रोन डागला, मात्र सौदीच्या एअर डिफेन्स प्रणालीने तो नष्ट केला. ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे सहा घरांचे किरकोळ नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

Donald Trump : फ्लोरिडातील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला आता डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या

उटावा : कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

Middle East Conflict: अमेरिकेने इराणच्या इस्फहानवर टाकले बंकर-बस्टर बॉम्ब; ट्रम्प यांच्याकडून धक्कादायक व्हिडिओ शेअर

नवी दिल्ली: अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील इस्फहान येथील एका मोठ्या दारूगोळ्याच्या गोदामाला लक्ष्य केले. या