Eknath Shinde : बळीराजा कायद्यांसाठी नाही; कायदे बळीराजासाठीच

नांदेड : “कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले,” अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली.


नांदेड-लोहा येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन व पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी हित, विकासकामे आणि विरोधकांवर जोरदार टीका करत दमदार राजकीय संदेश दिला.


शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळातील निर्णयांचा आढावा घेत सांगितले की, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चार सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली तसेच बंद पडलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. राज्यातील ४.२९ लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देत ३२.४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मराठवाड्यावरचा ‘दुष्काळवाडा’ हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीसाठी एन डी आर एफच्या निकषात बदल करून दुप्पट मदत देण्याचा निर्णय, नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टरपर्यंत वाढवणे, सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीलाही मदत सुरू करणे तसेच वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. याशिवाय, एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे त्यांनी नमूद केले.


केंद्र सरकारच्या योजनेसोबत राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये देत ‘नमो शेतकरी’ योजनेचा विस्तार करण्यात आला असून राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचाच आहे, असे ते म्हणाले. कर्जमाफीबाबत बोलताना त्यांनी 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्यात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीतून 450 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


आपत्तीच्या काळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी दसऱ्याच्या वेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न बोलावता थेट शेतकऱ्यांच्या मदतीला पाठवले आणि “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी जोडधंदे उपलब्ध करून देणे, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात शेतकरी नेते शंकरराव धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाचे स्वागत करत ते म्हणाले की, ते फक्त नांदेडचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ अधिक बळकट होईल. प्रत्येक गावात शेतकरी संघटना उभारून शेतकऱ्यांच्या समस्या थेट सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


“शब्द देताना दहा वेळा विचार करा; पण दिलेला शब्द कधी मोडू नका,” असे सांगत आपण दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, संघर्षातून मुख्यमंत्री झालो; सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही,” असे सांगत त्यांनी आपल्या प्रवासाची आठवण करून दिली.


महिलांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये देण्यात येत असून भविष्यात ही रक्कम वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुलींचे उच्च शिक्षण मोफत करणे तसेच ‘लखपती’ योजना यांसारखे निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.


अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ५६७ महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याला विकासाच्या मार्गावर नेल्याचा दावा करत त्यांनी धरणासारखे अनेक वर्षे प्रलंबित प्रकल्प पुढे नेल्याचे सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगत राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा, असा संदेश त्यांनी दिला. “सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन,” असे सांगत त्यांनी स्वतःची ओळख सर्वसामान्यांशी जोडली.


भाषणाच्या शेवटी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “मी देवाकडे एकच मागतो माझा शेतकरी सुखी होऊ दे, त्याच्या आत्महत्या थांबू देत.” नांदेडमधील या सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी हित, विकास आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.


यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार हेमंत भाऊ पाटील, माजी मंत्री श्रीराम म्हेत्रे, आमदार आनंदराव भंडारकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम, विजय गिरडे, विवेक देशमुख, उमेश मुंडे, गंगाधर बडुरे, सुधाकर भालेराव, विशाल कदम, आनंद बरसे, बाळासाहेब देशमुख आणि शंकर अण्णांचे दोन्ही सुपुत्र, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि हजारो शेतकरी आवर्जून उपस्थित होते.

Comments
Add Comment

यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची

इराणचा कुवेतच्या वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

कुवेत सिटी : इराणने कुवेत सिटी जवळच्या वीज तसेच पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय

ट्रम्पचे विमान सापडले संकटात, नागरी विमान जवळ येऊ लागताच अमेरिकेच्या हवाई दलाने केली धावपळ

फ्लोरिडा : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण असताना फ्लोरिडाच्या आकाशात धक्कादायक घटना घडली.

KKRvsMI : कोलकाता नाईट रायडर्सला हरवत मुंबई इंडियन्सने वानखेडेवर मिळवला ऐतिहासिक विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील