कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी घोषणा करण्यात आली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिका-यांना रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत, निशांत गायकवाड यांच्यासह कमर्चारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली.


पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन समन्वयातून सर्वांनी मिळून काम करायचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय आम्ही करणार नाही या भूमिकेतून काम करण्याची पद्धत अवलंबत न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे रविंद्र चव्हाण याप्रसंगी म्हणाले.





नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीमध्ये संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, उपाध्यक्ष किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची तर सचिव म्हणून प्रभुदास भोईर, मुखांश नाईक, गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे . अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी घोषित झाली, त्यात रायगड जिल्हा अध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले, दक्षिण मुंबई उपाध्यक्षपदी राहुल लहासे, वरळी विधानसभा अध्यक्षपदी शैलेश तोडकरी आणि वरळी विधानसभा सरचिटणीस पदी समीर शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि

Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism