भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, एक १० वर्षाचा मुलाचा आणि एक ८ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.


नेमकं प्रकरण काय?
गुरुग्राममध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या थार कारने तीन जणांना चिरडले आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना पटौदीच्या खोड गावात घडली. थार गाडीचा चालक, तिघांना धडक दिल्यानंतर गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांच्या अहवालानंतर, थार गाडी जप्त करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.


पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात ठेवले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटौदीजवळच्या खौद गावात रात्री सुमारे ११ वाजता एक व्यक्ती दोन मुलांसोबत प्रवास करत होता. तिघांनाही एका थार गाडीने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांनी थार गाडीही जप्त करून पोलीस ठाण्यात उभी केली.


थार गाडीचा धक्का इतका जोरदार होता की, तिघेही सुमारे तीस फूट दूर फेकले गेले. चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील. पोलिसांनी थार गाडी पोलीस ठाण्यात उभी केली असून आता आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीची ओळख दीपांशु (वय २५) अशी असून तो गोरियावासचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी त्याला लवकरच जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल.

Comments
Add Comment

आयआरजीसीचा मोठा दावा; इराणने अमेरिकेचे एफ-१६ लढाऊ विमान पाडले

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांची एफ-१६ लढाऊ

Rain Alert: 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, मुंबईसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट

नवी दिल्ली: देशभरात हवामानात बदल दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात आज पावसाची शक्यता आहे.

Noida Airport: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले विमान कधी उड्डाण घेईल?, जाणून घ्या बुकिंग कधी सुरू होईल? आणि ही सेवा कोणत्या शहरांसाठी सुरू केली जाईल?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. ११

भारतीय सैनिकांना मिळाल्या शत्रूला दणका देणार प्रहार लाईट मशिन गन

ग्वाल्हेर : भारतीय लष्कराचे सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या तब्बल दोन हजार

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.