Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे आज म्हणजेच रविवार २९ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. तपास व्यवस्थित व्हावा या उद्देशाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याआधी त्याला २९ मार्चपर्यंत न्यायालयाने अशोक खरातला पोलीस कोठडी दिली होती.


पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान एसआयटीच्यावतीने तपासाची थोडक्यात माहिती देऊन तपासाकरिता आणखी अवधी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सुर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, "आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे 'डमी' किंवा 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, ज्यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे 'द्रव्य' किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे." तर आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवला आहे. "मोबाईल जप्त केला आहे, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता," असा दावा त्यांनी केला. परंतु पीडित महिलेचे वकील एम.वाय.काळे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे आणि आरोपीच्या कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.


संशयित आरोपी अशोक खरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता. तो महिलांना गुंगी येणारा पदार्थ मिसळून तीर्थ प्रसाद देत होता. यामुळे महिलांना थोड्या वेळाने ग्लानी यायची. या स्थितीचा अशोक खरात गैरफायदा घेत होता. तो महिलांचा लैंगिक छळ करत होता, असा आरोप होत आहे. या प्रकरणी एसआयटीने सीसीटीव्ही कॅमेरा, मोठी रोख रक्कम, लॅपटॉप, रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त केली आहेत. आर्थिक व्यवहार, कथित धार्मिक विधी आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.


अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. भीती निर्माण करण्यासाठी तो वन्यजीव कायद्याचे उल्लंघन करत होता. काही वेळा सापाचा वापर करत होता; असाही आरोप होत आहे.


आतापर्यंत खरातविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.

Comments
Add Comment

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा बांकीपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय

बांकीपूर : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत जन

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या घटनादुरुस्तीचे पुरावे सादर करा!

- केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; वैध प्रस्ताव अथवा ठराव अद्याप प्राप्त नाहीत मुंबई :

Akhilesh Reddy : मॅच फिक्सिंग प्रकरणात अमेरिकन क्रिकेटपटूला ICCचा दणका! अखिलेश रेड्डीवर तब्बल ८ वर्षांची बंदी

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कठोर भूमिका घेत असून, आता

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

NDA Mangal Milan : एनडीएची मंगल मिलन बैठक मंगळवार ४ ऑगस्ट रोजी होणार

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवार ३ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. निवडक

Chandrashekhar Bawankule : चंद्रकांतदादा पाटील हे संस्कारमय आणि आदर्श व्यक्तिमत्त्व, त्यांच्यावरील टीका समाज मान्य करणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सिंधुदुर्ग : "चंद्रकांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने संस्कारमय आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आयुष्यभर