Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला (यूएनएचआरसी) पाठवलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी मिनाब शहरातील एका शाळेवर ‘पूर्वनियोजित हल्ला’ झाल्याचा आरोप केला. त्यांनी या घटनेला ‘मानवतेविरुद्धचा गुन्हा’ असे संबोधले. अराघची यांनी सांगितले की, शजराह तैय्यबेह प्राथमिक शाळेवर झालेल्या या हल्ल्यात १७५ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला.


अराघची म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल स्वतःकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याचा दावा करतात, त्यामुळे शाळेवर झालेला हल्ला चुकून झाला असे मानता येणार नाही. त्यांनी याला युद्धगुन्हा तसेच मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा ठरवले. अशा कृत्याचा संपूर्ण जगभर निषेध व्हायला हवा आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही, तो लपवता येणार नाही आणि त्यावर शांतता किंवा उदासीनता दाखवणेही योग्य नाही. हा हल्ला केवळ ‘घटना’ किंवा ‘चूक’ नव्हती, असा त्यांनी जोर देऊन उल्लेख केला. अमेरिकेकडून दिली जाणारी परस्परविरोधी विधाने ही आपला गुन्हा झाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि अशा विधानांमुळे जबाबदारीपासून सुटका होऊ शकत नाही, असे सांगितले.


अहवालानुसार, मिनाबमधील या शाळेवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ला झाला होता, जो युद्धाचा पहिलाच दिवस होता. २७ मार्च रोजी युद्धाला एक महिना पूर्ण होत असताना अराघची यांनी ही प्रतिक्रिया दिली.


२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण-अमेरिका युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेच्या टोमहॉक क्रूझ क्षेपणास्त्राने दक्षिण इराणमधील मिनाब येथील शजराह तैय्यबेह प्राथमिक शाळेला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किमान १७५ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता, तर अनेक जण जखमी झाले.

Comments
Add Comment

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना

Iran-US-Israel War : अमेरिका बॅकफूटवर ? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामात पुन्हा वाढ

- डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दविरामची मुदत थेट ६ एप्रिलपर्यंत वाढवली अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या

अमेरिकेने घेतलेल्या निर्णयामुळे जगावर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली: इराण-अमेरिका युद्ध संघर्षात इराण आणि इस्रायल होरपळून निघाले आहेत. या युद्धाच्या झळा इतर देशांना

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात