सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गतची कामे गुणवत्तेसह पूर्ण करण्यास गती द्यावी - मंत्री शिवेंद्रराजे भोसले

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित व सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर देत कामांना गती द्यावी, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.


सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, उपवनसंरक्षक (पश्चिम) सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मंत्री भोसले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने करण्यात येणारी सर्व कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राधान्य क्रमातील कामे आहेत. ही सर्व कामे दर्जात्मक होण्यासाठी त्रयस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्रयस्थ पक्षाकडून तपासणी केल्यास कामे गुणवत्तापूर्वक होतील यासाठी दक्ष रहावे. ज्या कामांना मंजूरी मिळाली आहे व कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. वन विभाग व जलसंपदा विभाागने रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी कार्यवाही सत्वर करावी. ठेकेदारांनीही विहित मुदतीत कामे पुर्ण करण्यावर अधिक भर द्यावा. पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे तसेच रात्रीच्या वेळीही कामे सुरू ठेवावीत. कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाईबाबत अवगत करण्यात यावे. अशा सूचना त्यांनी दिल्या.


सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता तयार करतांना सुशोभिकरणावर भर द्यावा. तसेच ठिकाठिकाणी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने लावण्यात येणारे दिशादर्शक फलक यांच्या आकारात एकसमानता असावी, असेही मंत्री श्री. भोसले यांनी सूचित केले.


यावेळी विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित व मंजूर कामांची माहिती दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील कुंभमेळा प्रस्तावित आवश्यक परवानग्या व त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व इतरबाबत बैठकीत माहिती दिली. अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आराखड्याद्वारे सादरीकरण केले. तसेच प्रत्येक कामासाठी नियुक्त केलेल्या संस्था व ठेकेदार यांच्याशी कामांबाबत असलेल्या अडीअडचणींबाबत मंत्री श्री .भोसले यांनी चर्चा केली.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)