Bigg Boss Marathi 6 : बीग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख ठरली ?

मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले. या सीझनमधील भांडणं, टास्क, हेवेदावे आणि चढाओढ यामुळे बीग बॉस मराठी ६ सीझन चांगलाच गाजला पण त्याहीपेक्षा जास्त बाहेर आल्यानंतर बिग बॉस स्पर्धकांनी केलेल्या दाव्यावरून मोठी खळबळ उडाली होती.

सोशल मिडियावर चाहते बिग बॉस मराठी ६ चा विजेता यंदा कोण ठरणार? याची चर्चा करत असून बिग बॉस मराठी 6 चा ग्रँड फिनाले कधी पार पाडणार याविषयी प्रेक्षकांची
उत्सुकता प्रचंड वाढली आहे.


बिग बॉसच्या एका प्रोमोमुळे प्रेक्षकांना बिग बॉसच्या फिनालेच्या तारखेचा अंदाज आला असून यंदा सीझनचा ग्रँड फिनाले १९एप्रिल २०२६ ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या सोशल मिडियावर ग्रँड फिनाले च्या तारखे विषयी जोरदार चर्चा सुरू असून फॅमिली वीकमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेल्या संकेत पाठकच्या पत्नीने जाता जाता केलेल्या एका वाक्यामुळे प्रेक्षकांना फिनालेची हिंट मिळाली आहे. "आता आपण 19 एप्रिलला भेटू." असं म्हटल्याची चर्चा आहे.


मात्र, याबाबत कलर्स मराठी वाहिनीकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे ७०दिवस भरले असून आता तीस दिवसांचा गेम राहिलाय. बिग बॉस ६ चा ग्रँड फिनाले कधी पार पाडणार आणि यंदाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये प्रचंड वाढली आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम

सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला

Sonalee Kulkarni Manjula song : मंजुळा गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्राची अप्सरा सज्ज

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात

Cup Bashi Movie : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सासू-सुनेची 'ही' कमाल जोडी, 'कप बशी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

सासू आणि सुनेचं नातं म्हटलं की प्रेम, आदर राग तर कधी रुसुवे फुगवे अशा संमिश्र भावना येतात. लवकरच या नात्यातील एक

पॅराक्वाट विषबाधेमुळे राहुल रामकृष्णच्या भावाचा मृत्यू, बंदीसाठी सरकारला केले आवाहन

मुंबई: तेलुगू अभिनेते राहुल रामकृष्ण आपल्या भावाच्या निधनामुळे शोक व्यक्त करत आहेत. पॅराक्वाट विषबाधेमुळे

Ankita walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकितानं चाहत्यांना दिली 'ही' गूड न्यूज, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : बिग बॉस फेम लोकप्रिय मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता