खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार नाही


राज्यसभेची खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसण्याखेरीज संजय राऊतांकडे पर्याय नाही. संजय राऊत खासदारकीसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार आहेत. उद्धव ठाकरे आपल्याला पुन्हा खासदार करणार नाहीत हे कळून चुकल्याने पूर्वीपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाविरोधात पडद्याआडून खेळी रचणारे राऊत आता खुलेआम उबाठा गटाला सोडचिठ्टी देऊन अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला.


उबाठा गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली असून उद्धव ठाकरे विरुद्ध राऊत, आदित्य ठाकरे विरुद्ध राऊत असा सामना रंगतदार होत असून त्याचा आनंद महाराष्ट्रातील जनता घेत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला तिलांजली देत औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार नाही असे नवनाथ बन यांनी सुनावले. सत्तेसाठी हपापपलेले उद्धव ठाकरे आणि राऊत हिंदुत्व सोडत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. भाजपामुळे नव्हे तर राऊतांमुळे, उद्धव ठाकरेंमुळे हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे असा घणाघात त्यांनी केला. राऊतांचे हिंदुत्व बेगडी असून त्यामुळेच मतदारांनी धडा शिकवला आहे असेही ते म्हणाले.


“माझा जन्म शिवसेनेत झाला, जन्मापासून मी शिवसेनेत आहे” असा हास्यास्पद दावा करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत नवनाथ बन म्हणाले की राऊतांचा हा दावा म्हणजे हास्यजत्रातील एक प्रहसन आहे. राऊतांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की, संपवण्यासाठी झाला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. शिवसेनेच्या विरोधात राऊतांनी लिहिलेले लेखही महाराष्ट्रातील जनतेच्या अजूनही स्मरणात आहेत. उबाठा गटाला संपवण्याची सुपारी राऊतांनी काँग्रेसकडून घेतली असून उबाठा गट संपूर्णपणे संपवल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात