सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल दिला असून, त्यांचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे.


न्यायालयाच्या निष्कर्षानुसार, या प्रकरणाचा सखोल तपास आणि उपलब्ध पुराव्यांवरून मृत्यूचे कारण बुडणे हेच असल्याचे निश्चित झाले आहे. कोरोनरने हे देखील स्पष्ट केले की हा एक अपघाती मृत्यू होता.या निकालामुळे या प्रकरणाभोवतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की यात कोणताही कट किंवा गुन्हेगारी पैलू सामील नव्हता. पुढील तपशील अपेक्षित आहेत.


विशेष म्हणजे, आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून डिसेंबर २०२५ मध्ये गुवाहाटी न्यायालयात गायकाच्या मृत्यू प्रकरणी सविस्तर आरोपपत्र दाखल केले होते.


१९ सप्टेंबर, २०२५ रोजी सिंगापूरमध्ये झुबीन गर्ग यांच्या रहस्यमय मृत्यूनंतर तपास सुरू झाला. नॉर्थईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जात असताना सागरी प्रवासात गर्ग यांचा मृत्यू झाला.


गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सात जणांची नावे आहेत. त्यापैकी, फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, बँड सदस्य शेखरज्योती गोस्वामी आणि सह-गायिका अमृतप्रभा महंता यांच्यासह चौघांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. जुबीन गर्ग यांचे चुलत भाऊ आणि निलंबित आसाम पोलीस अधिकारी संदीपान गर्ग यांच्यावर 'सदोष मनुष्यवध' केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्रात गर्ग यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याचेही नाव आहे.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून