राज्यातील ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण

शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण


मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले.





विधान भवन, मुंबई येथे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम वितरित करण्यात आली असून, अहिल्यानगर ₹१०८.३० कोटी, अकोला ₹३६.७६ कोटी, अमरावती ₹५३.३४ कोटी, बीड ₹७२.७० कोटी, भंडारा ₹४१.६५ कोटी, बुलढाणा ₹६६.७४ कोटी, चंद्रपूर ₹४७.९५ कोटी, छत्रपती संभाजीनगर ₹६८.१८ कोटी, धाराशिव ₹४६.८५ कोटी, धुळे ₹३०.६३ कोटी, गडचिरोली ₹२८.५० कोटी, गोंदिया ₹४२.४५ कोटी, हिंगोली ₹३५.०० कोटी, जळगाव ₹७७.४० कोटी, जालना ₹५८.८२ कोटी, कोल्हापूर ₹९२.३३ कोटी, लातूर ₹५३.८७ कोटी, नागपूर ₹३३.८८ कोटी, नांदेड ₹७६.५० कोटी, नंदुरबार ₹२०.४७ कोटी, नाशिक ₹८३.८६ कोटी, पालघर ₹१९.९५ कोटी, परभणी ₹४९.७९ कोटी, पुणे ₹८५.२४ कोटी, रायगड ₹२२.७९ कोटी, रत्नागिरी ₹ ३१.२१ कोटी, सांगली ₹७५.४९ कोटी, सातारा ₹८७.०७ कोटी, सिंधुदुर्ग ₹२३.५३ कोटी, सोलापूर ₹९७.५२ कोटी, ठाणे ₹१४.१८ कोटी, वर्धा ₹२५.६० कोटी, वाशिम ₹३३.०५ कोटी आणि यवतमाळला ₹५७.१८ कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे.


‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत २४ मार्च २०२६ अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण १३०१७.३० कोटी रुपये ९३.०८ लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबईत उभी राहणार १० हजार कोटींची 'इंटरनॅशनल मेडिसिटी'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार आणि अमेरिकेच्या 'क्लीव्हलँड क्लिनिक'मध्ये सामंजस्य करार मुंबई :

Mumbai birth records : मुंबईतील 19,734 जन्म दाखल्यांमधील दुरुस्त्या रद्द; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे सरकारचे आदेश

MUMBAI : महाराष्ट्र सरकारने 2024 ते 2026 या कालावधीत मुंबईत जन्म प्रमाणपत्रांमध्ये करण्यात आलेल्या 19,734 दुरुस्त्या रद्द

Nashik MHADA Case : बिपीन काजळे, कल्पेश पाटील महिनाभरानंतर जेलबाहेर; जामीन मंजूर

Nashik MHADA Case : नाशिक शहरातील ‘म्हाडा’ जमीन आरक्षण फसवणूक (Mhada Land Scam) घोटाळ्यातील मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणांतील

Fifa World Cup 2026 Prize Money : विश्वविजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव ! प्रत्येक पात्र संघ कोट्यवधी रुपये जिंकेल; कोणाला किती कोटी रुपये मिळतील?

मुंबई : फुटबॉल जगतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे फिफा विश्वचषक. फिफा विश्वचषक २०२६ उद्यापासून म्हणजेच ११

Ritu Tawde : धमक्यांना घाबरत नाही, बॉम्बस्फोट धमकीच्या ईमेल वर महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत्या १५ दिवसांत मोठे फेरबदल होणार

वर्धापनदिन कार्यक्रमात संकेत; मोदींची नेहरुंशी तुलना होऊ शकत नसल्याचे पवारांचे मत मुंबई : विधानपरिषद