अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. लवकरच धुरंधर २ सिनेमा आणखीन नवा विक्रम करणार आहे.
धुरंधर १ सिनेमानं कमी दिवसांत हजार कोटींचा टप्पा केला. पण धुरंधर २ सिनेमा त्यापेक्षा कमी कालावधीत म्हणजेच जेमतेम आठवड्याभरातच हजार कोटींचा टप्पा पार करणार असं दिसत आहे. प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर २ हा चित्रपट उत्तम कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभरात छप्परफाड कमाई केली आहे. अवघ्या सहा दिवसांत या सिनेमानं ९०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता सातव्या दिवशी हा चित्रपट हजार कोटींचा टप्पा पार करणार हे दिसत आहे.
धुरंधर २ चे कलेक्शन
पेड प्रीव्यू - ४३ कोटींची कमाई - बुधवार १८ मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
पहिला दिवस - १०२.५५ कोटी - गुरुवार १९ मार्च २०२६ (गुढी पाडव्याची सुट्टी)
दुसरा दिवस - ८०.७२ कोटी - शुक्रवार २० मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
तिसरा दिवस - ११३ कोटी - शनिवार २१ मार्च २०२६ (ईदची सुट्टी)
चौथा दिवस - ११४.८५ कोटी - रविवार २२ मार्च २०२६ (सुट्टी)
पाचवा दिवस - ६५ कोटी - सोमवार २३ मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
सहावा दिवस - ५६.५५ कोटी - मंगळवार २४ मार्च २०२६ (कामकाजाचा दिवस)
काय आहे धुरंधर २ ?
'धुरंधर २' (Dhurandhar 2: The Revenge) हा आदित्य धर दिग्दर्शित एक बहुचर्चित हिंदी अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे, जो १९ मार्च २०२६ रोजी गुढी पाडव्याला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांसारखी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते. या सिनेमाचा कालावधी तब्बल ३ तास ५२ मिनिटे इतका असून तो आधुनिक सिनेमातील सर्वात मोठा सिनेमा आहे.