फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअ‍ॅप नियंत्रक मेटा कंपनीला कोर्टाचा दणका, भरावा लागणार अब्जावधींचा दंड

न्यू मेक्सिको : अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील कोर्टाच्या ज्युरीने 'मेटा' या सोशल मीडिया कंपनीला मुलांच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवल्याचा ठपका ठेवून ३७५ दशलक्ष यूएस डॉलरचा अर्थात ३५ हजार २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा अब्जावधींचा दंड फिर्यादी पक्षाच्या मागणीपेक्षा कमीच आहे.


फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप चालवणाऱ्या मेटा कंपनीने सुरक्षेपेक्षा नफ्याला प्राधान्य दिले आणि राज्याच्या अनुचित व्यवहार कायद्याचे उल्लंघन केले, असे सांगत ज्युरीने मेटा कंपनीला दोषी ठरवले. कंपनीने मुलांच्या असुरक्षिततेचा गैरफायदा घेतला आणि प्लॅटफॉर्मच्या धोक्यांविषयी दिशाभूल करणारे दावे केले, असेही ज्युरीने सांगितले. ज्युरीने प्रत्येक उल्लंघनाचा स्वतंत्रपणे विचार करून, एकूण ३७५ दशलक्ष डॉलर्स (३५,२०० कोटी रुपये) चा दंड ठोठावला. मेटाच्या प्लॅटफॉर्मवर हजारो मुले प्रभावित झाली होती, हे ज्युरीने मान्य केले.


मेटाच्या सेवांमुळे सार्वजनिक हानी होते की नाही आणि कंपनीला बाल सुरक्षा कार्यक्रमांसाठी पैसे द्यावे लागतील की नाही, याचा निर्णय न्यायाधीश देणार आहेत. या संदर्भातील सुनावणी मे २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मेटाने ज्युरीच्या निर्णयाविरोधात अपिलात जाण्याची तयारी सुरू केली आहे.


प्लॅटफॉर्म मुलांना जास्त काळ गुंतवून ठेवण्यासाठी अल्गोरिदम वापरतात, ज्यामुळे धोके वाढतात. मेटाने युझरना व्यसन लावणारी वैशिष्ट्ये तयार केली आहे, असाही ठपका सुनावणी दरम्यान ज्युरीने मेटा कंपनीवर ठेवला. काही एजन्सींनी मुलांच्या नावावर तयार केलेल्या बनावट प्रोफाइलचा वापर केला. लैंगिक विषयांशी संबंधित कंटेंट प्रसिद्ध केला. या प्रकरणात मेटाकडून जलद कारवाई अपेक्षित होती पण ती लवकर झाली नाही; असे ज्युरीने सुनावणीवेळी सांगितले.


न्यायालयात पोहोचलेल्या पहिल्या प्रकरणांपैकी हे एक आहे. अमेरिकेतील ४० हून अधिक राज्यांनी मेटावर खटले दाखल केले असून, हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरुणांच्या मानसिक आरोग्याला गंभीर हानी पोहोचवत असल्याचा आरोप केला आहे. न्यू मेक्सिकोतील कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे मुलांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्याच्या लढ्यातील पहिले लक्षणीय यश मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.