आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर ट्यून'ने (संकेत-धुन) आणि त्यानंतर 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताच्या दोन कडव्यांच्या आवृत्तीने (कालावधी ६५ सेकंद) करण्याची परंपरा आहे.


२८ जानेवारी २०२६ रोजी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या राष्ट्रीय गीताशी संबंधित मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने, २६ मार्च २०२६ पासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून रोज सहा कडव्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय गीत प्रसारित केले जाईल.नवीन आवृत्तीचा कालावधी ३ मिनिटे १० सेकंद आहे.


प्रसारित होणारी सुरवातीची आवृत्ती, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. चंद्रशेखर वझे यांनी 'राग देस'मध्ये गायली आहे.


वाद्यवृंदाच्या प्रादेशिक वैविध्याचा समावेश करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय गीताच्या आणखी काही आवृत्त्या ध्वनिमुद्रित केल्या जात आहेत. या आवृत्त्या संबंधित राज्यांमधील आकाशवाणी केंद्रांद्वारे स्वीकारल्या जातील.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी

पीएनजी आणि सीएनजी पुरवठ्यावर भर; भारताकडे पुरेसा इंधन साठा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने बुधवारी देशातील पेट्रोलियम

एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेले वृत्त

सिंगापूर न्यायालयाने झुबीन गर्ग यांचा मृत्यू अपघाती ठरवला; कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली घसरल्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांततेच्या आशेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा

मद्यप्रेमींच्या खिशाला लागणार कात्री, बिअर आणि दारुच्या किमती वाढणार?

मुंबई: दारु पिणाऱ्यांच्या खिशाला लवकरच कात्री लागू शकते. कारण दारुच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.