मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे...

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार..


उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन..


मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.


या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले.


मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या खरेदीसाठी संस्थांच्या उड्या; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर आकारला जाणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

वकिलांना ३ महिने काळ्या कोटापासून मिळणार सुट्टी; जाणून घ्या कारण

पुणे : वाढत्या उष्णतेमुळे वकिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात पारंपरिक काळा

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८