कोनेरू हम्पीची सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी या महिन्यात सायप्रसमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कॅन्डिडेट्स स्पर्धेत सहभागी होणार नाही. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यजमान देशातील सुरक्षा परिस्थितीबद्दल तिने चिंता व्यक्त केली होती. आता तिने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हम्पीने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. तिने लिहिले, "खूप विचारविनिमय केल्यानंतर, मी फिडे महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार घेण्याचा कठीण निर्णय घेतला आहे."


पश्चिम आशियातील तणावामुळे हम्पीला तिच्या सुरक्षेची चिंता वाटत होती. बतिने 'एक्स' वर लिहिले, "मला माहित आहे की मी एकटी कदाचित काहीही बदलू शकत नाही. पण मी कॅन्डिडेट्समध्ये खेळले किंवा नाही, तरी मला जे वाटते ते व्यक्त करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते." तिने पुढे लिहिले, "ज्या सर्वांनी पाठिंबा दर्शवला आहे, त्या सर्वांची मी आभारी आहे. ज्यांना या परिस्थितीची संवेदनशीलता समजत नसेल, त्यांच्यासाठी मी एवढेच सांगेन."


जागतिक अजिंक्यपदाच्या विजेतेपदासाठी आव्हान देणारे खेळाडू निश्चित करणारी कॅन्डिडेट्स स्पर्धा २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. पुरुषांचे विजेतेपद भारताच्या डी. गुकेश यांच्याकडे, तर महिलांचे विजेतेपद चीनच्या जू वेनजुन यांच्याकडे आहे.


बुद्धिबळाची जागतिक नियामक संस्था असलेल्या फिडेचे (FIDE) मुख्य कार्यकारी अधिकारी, एमिल सुटोव्स्की यांनी या चिंता फेटाळून लावल्या आणि सांगितले की, स्थळ बदलण्याची गरज भासेल असे काहीही धोकादायक नाही. सुटोव्स्की म्हणाले, "आमच्या योजना बदललेल्या नाहीत. आम्ही कॅन्डिडेट्स स्पर्धेच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात आहोत. अर्थातच, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सायप्रस युद्धक्षेत्र किंवा संघर्षक्षेत्रापासून फार दूर नाही, पण त्याच वेळी ते कोणत्याही प्रकारे थेट त्यात सामील नाही आणि युद्धजन्य परिस्थितीतही नाही." सायप्रस हे भूमध्य समुद्रातील तिसरे सर्वात मोठे बेट असून ते तुर्कस्तानच्या दक्षिणेस वसलेले आहे. ते युरोपियन युनियनचे सदस्य आहे.

Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.