धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.


अटक करण्यात आलेला कर्मचारी ३६ वर्षीय सुमित कुमार असून तो वायुसेनेत मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर एजंटना लढाऊ विमानांची तैनाती आणि क्षेपणास्त्र प्रणालींसारखी अत्यंत संवेदनशील माहिती लीक केल्याचा आरोप आहे.


सुमित हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील लाहुरपार गावाचा रहिवासी आहे. सध्या आरोपीविरुद्ध अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पोलिसांनी हेरगिरी प्रकरणात जैसलमेर येथील झबरा राम याला अटक केली होती. हे संपूर्ण प्रकरण जानेवारी महिन्यात समोर आले, जेव्हा राजस्थान गुप्तचर विभागाने जैसलमेरमधील झबरा रामला अटक केली होती. चौकशीदरम्यान सुमितचे नाव या नेटवर्कमधील महत्त्वाची कडी म्हणून समोर आले. झबरा रामकडून मिळालेल्या माहितीनंतरच ही कारवाई करण्यात आली.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमितने आपल्या पदाचा गैरवापर करून वायुसेनेच्या कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवली आणि ती पुढे पाठवली. यात लढाऊ विमानांची तैनाती, क्षेपणास्त्र प्रणाली तसेच बीकानेरमधील चाबुआ आणि नळ वायुसेना स्थानकांवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतची माहिती समाविष्ट होती. तपासात असेही आढळले की, त्याने आपल्या नावावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांचा वापर करून पाकिस्तानी हँडलर्सना सोशल मीडिया खाती तयार करण्यास मदत केली, ज्यामुळे गुप्त संवाद साधणे शक्य झाले.


विश्वसनीय माहितीच्या आधारे राजस्थान गुप्तचर विभागाने वायुसेना गुप्तचर विभागाच्या समन्वयाने सुमितला चाबुआ येथून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात आणले.

Comments
Add Comment

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री