पंतप्रधान मोदींनी केली इराणी राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२१ मार्च) इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांना ईद आणि नौरोजच्या शुभेच्छा दिल्या. या चर्चेदरम्यान पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी नांदावी, अशी आशा व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट लिहून माहिती दिली आहे.


याप्रसंगी दूरध्वनीवर संवाद साधतांना पंतप्रधानांनी इरणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. असे हल्ले प्रादेशिक स्थिरतेसाठी धोकादायक ठरत असून जागतिक पुरवठा साखळीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी समुद्री मार्गांची मुक्तता कायम ठेवण्यावरही भर देण्यात आला. व्यापार सुरळीत चालण्यासाठी जलमार्ग खुले आणि सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.


दरम्यान, नौरोजच्या निमित्तानेही पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा देत सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी कामना व्यक्त केली. नौरोज हा पारशी आणि इराणी समुदायाचा नववर्षाचा सण असून वसंत ऋतूच्या प्रारंभी साजरा केला जातो.

Comments
Add Comment

मृतदेहासह ३०० पेक्षा जास्त प्रवाशांनी साडेतेरा तास केला विमानप्रवास, जाणून घ्या हवेतच महिलेचा मृत्यू होऊनही विमान का परतले नाही ?

लंडन : हाँगकाँग ते लंडन असा प्रवास करत असलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात सर्व क्रू सदस्यांसह एकूण ३३१ जण

Iran-US-Israel War : ट्रम्प यांचा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम; होर्मुज सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा ...

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू

Iran Israel War: इराणचा इस्रायलमधील डिमोना शहरावर हल्ला, मराठी बहुल भागातील ४७ जण जखमी

तेल अवीव: इस्रायल आणि इराणमधील संघर्षाने शनिवारी रात्री एक अत्यंत भयावह वळण घेतले. इराणने डागलेले एक बॅलिस्टिक

पाकड्यांना पाठवली ईदी, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी ठार

मुरीदके : पाकिस्तानला अज्ञातांनी ईदी पाठवली आहे. पाकिस्तानमधील मुरीदके येथील लश्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी

होर्मुझच्या स्थिरतेसाठी युरोप जपानसह सहा देश एकवटले

तेहरान : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव हाताळण्यासाठी युरोप आणि जपान महत्त्वपूर्ण कारवाई करतील असे

लक्षात ठेवेन, ट्रम्प यांचा नाटो राष्ट्रांना इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या