Iran-US-Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबद्दल इराणने केली यूएईकडून भरपाईची मागणी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, शेजारी देशांबरोबर राजनैतिक तणाव वाढवत इराणने आता संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. इराणने संयुक्त राष्ट्र संघ यांच्या महासचिवांना पत्र लिहून अमेरिकन हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी यूएईकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.


या पत्रात इराणचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत अमीर सईद इरवानी यांनी आरोप केला आहे की, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकन सैन्याने संयुक्त अरब अमिरातीची जमीन वापरली. त्यामुळे अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यांमुळे इराणचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई करण्याची जबाबदारी यूएईवर येते, असा दावा त्यांनी केला आहे.इराणचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत अमीर सईद इरवानी यांनी महासचिवांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणला झालेल्या सर्व भौतिक आणि नैतिक नुकसानीची भरपाई देणे संबंधित देशांचे दायित्व आहे.


संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणकडून हे पत्र सात तक्रारींनंतर देण्यात आले आहे. या सात तक्रारींमध्ये इराणने आरोप केला होता की, अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरोधातील लष्करी कारवायांमध्ये प्रादेशिक देशांच्या हवाई क्षेत्राचा आणि जमिनीचा बेकायदेशीर वापर केला. दुसऱ्या एका पत्रात इराणने नमूद केले होते की, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन दलांनी इराणवर हल्ला केला, जो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करणारा होता. तसेच या हल्ल्यात जॉर्डनसह काही प्रादेशिक देशांच्या जमिनीचा वापर करून अमेरिका-इस्रायलने इराणवर कारवाई केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल

Gold mine collapses : खोदकामादरम्यान सोन्याची खाण कोसळली; 30 कामगारांचा मृत्यू, अनेक जण अडकले

बांगुई: मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकामध्ये सोन्याची खाण कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. देशाच्या पश्चिम भागातील

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू