रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये झालेल्या बोट अपघातात जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा फेलिधू परिसरात त्यांची स्पीडबोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या अपघातानंतर त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आले असून सध्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत सिंघानिया यांच्या व्यतिरिक्त आणखी सात जण उपस्थित होते. यात ब्रिटन आणि रशियाची प्रत्येकी एक महिला आणि पाच पुरुष होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. बोटीत असलेल्यांपैकी दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांपैकी एक भारतीय नागरिक आहे. बचावपथक बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे.


या घटनेमुळे उद्योग क्षेत्रात आणि व्यावसायिक वर्तुळातून त्यांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच अपघाताच नेमकं कारण समोर येईल


गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही जवळपास ११ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचा व्यवसाय वस्त्रोद्योग, डेनिम, कंझ्युमर प्रॉडक्ट्स, अभियांत्रिकी आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. तयार कपड्यांच्या क्षेत्रात रेमंडचा मोठा दबदबा असून डेनिम उत्पादनातही कंपनीचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी

पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मुंबई  : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची