अशोक खरातशी माझे नाव जोडणे चुकीचे, खरातने खात्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप दीपक केसरकरांनी फेटाळला

मुंबई : नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असतानाच, आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अशोक खरातशी माझे संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचे असून, केवळ इशानेश्वर मंदिरामुळे माझी त्याच्याशी ओळख झाली होती," असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.


अशोक खरातवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्याचे विविध नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर म्हणाले की, "मी देवभक्त असल्यामुळे शिर्डीला जाताना सिन्नर येथील इशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असे. याच मंदिराच्या रस्त्याच्या मागणीसाठी खरात मुंबईत आला होता, तेव्हाचा तो फोटो आहे. तो रस्ता आता पूर्ण झाला आहे, हे कुणीही पाहू शकते. एखाद्या सार्वजनिक कामासाठी आलेल्या व्यक्तीसोबत फोटो असणे याचा अर्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील कृत्यांशी आमचा संबंध आहे असा होत नाही. खरातच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याबाबत स्पष्टीकरण देताना, ओळखीच्या नात्याने अशा कार्यक्रमांना हजेरी लावणे ही सामाजिक पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले.


केसरकर यांच्या काळात 'अशोक खरात शिक्षण खाते चालवत होता' असा आरोप उबाठा गटाने केला होता. यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, "अशोक खरात एकदाही माझ्या शासकीय कार्यालयात आलेला नाही. मग तो खाते कसे चालवणार? माझ्या कार्यकाळात शिक्षण विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, तसे निर्णय यापूर्वी कधीही झाले नव्हते. माझे खाते उत्तम रितीने काम करत होते, त्यामुळे असे आरोप करणे हास्यास्पद आहे."


खरातला न्यायालय योग्य शिक्षा देईल


अशोक खरातला त्याच्या कृत्याबद्दल न्यायालय योग्य ती शिक्षा देईलच, पण केवळ ओळखीमुळे राजकीय नेत्यांचे फोटो वापरून त्यांना यात ओढणे चुकीचे आहे. त्याच्या वैयक्तिक गोष्टींबाबत मला कोणतीही माहिती नाही, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या