गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होताना दिसतोय. अशा परिस्थितीत भारताच्या गुप्तचर यंत्रणा रॉचे (Research and Analysis Wing RAW) माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीत इराण या संघर्षात वरचढ ठरू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.


इराणच्या बाजूने परिस्थिती


अमरजीत सिंह दुलत म्हणाले की, भारताचे इराणसोबत जुने आणि मजबूत संबंध आहेत. आम्ही नेहमीच इराणसोबत उभे राहिलो आहोत. सध्याच्या घडामोडींचा विचार करता इराण या संघर्षात जिंकू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, सुरू असलेला संघर्ष चिंताजनक असून तो दुर्दैवी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


भारत-इराण संबंधांची पार्श्वभूमी


भारत आणि इराण यांच्यातील संबंध स्वातंत्र्यानंतर सातत्याने दृढ होत गेले. 1950 ते 1970 या काळात इराणचा कल अमेरिकेकडे असतानाही भारताशी संबंध कायम राहिले. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला. तरीही भारताने संतुलित भूमिका घेत इराण आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध टिकवले. ऊर्जा क्षेत्रात इराण हा भारतासाठी महत्त्वाचा तेल पुरवठादार राहिला आहे.


भारतासाठी धोरणात्मक महत्त्व


चाबहार बंदर हे भारत-इराण संबंधांमधील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. भारत या बंदराच्या विकासात सक्रिय राहिला आहे. या बंदरामुळे पाकिस्तानला बायपास करत भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियात थेट प्रवेश मिळतो.


व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग


International North South Transport Corridor (INSTC) हा भारत, इराण आणि रशिया यांना जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. व्यापार आणि लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. तसेच युरोप-आशिया कनेक्टिव्हिटी मजबूत करणारा हा मार्ग आहे.


भारतासमोरील ऊर्जा आव्हान


पश्चिम आशियामधील वाढत्या संघर्षामुळे तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या