गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले


मुंबईतील गिरगावसह अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा निघतात. तसेच, मुंबईतील गिरगावची शोभायात्रा ही प्रसिद्ध असून ही शोभायात्रा पाहण्यासाठी फार लांबून नागरिक गिरगाव येथे येत असतात.


गिरगावची शोभायात्रा म्हणजे मुंबईची शान आहे. मात्र, यंदा या मिरवणुकीत कावासाकी निन्जा H2 सारख्या हायपर स्पोर्ट्स बाईकचा त्रासदायक आवाज घुमला. या बाइकला रेस करत असताना गौरी या तरुणीला महिला पोलिसांनी बजावलं आणि तिथे वाद झाला. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर गौरी मोरे आपल्या महागड्या बाईकला गर्दीत रेस' देत असतानाच एका महिला पोलीसाने तिला कडक शब्दांत बजावलं.


बाइक रेस करताना पाहून पोलिसांचा संताप :


मिरवणुकीसाठी गिरगावमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी उसळलेली असते. अशा संवेदनशील ठिकाणी गौरी मोरे आपल्या स्पोर्ट्स बाईकचा एक्सलेटर जोरात फिरवून सायलेन्सरचा मोठा आवाज काढत होती. त्यामुळे हा गोंधळ पाहून तिथे तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी धावत आल्या. त्यांनी थेट गाडीसमोर उभं राहून, अशा प्रकारे बाईक रेस करणं लोकांच्या जिवावर बेतू शकतं, असं सांगत त्यांनी गौरीला आणि तिथल्या तरुणांना चांगलच बजावलं.


तसेच, या महागड्या बाईकला 'नंबर प्लेट' नसल्याचा मुद्दाही पोलिसांनी यावेळी उपस्थित केला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेताच तिथल्या काही स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त करत त्यांची चावी काढून घेण्याची मागणी केली.


परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी गर्दी मागे हटवली आणि संबंधित बाईकस्वारांना तिथून बाजूला व्हायला भाग पाडलं असून हा





या शोभायात्रेत रिल्स बनवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण अतरंगी कृत्य करताना दिसतात. मात्र, गिरगावसारख्या गर्दीच्या ठिकाणी असं वागणं गौरी मोरेला चांगलंच महागात पडलं आहे. हे प्रकरण सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून काहीजण आता गौरीची बाजू घेताना पाहायला मिळत आहे. तर काहीजणांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे