सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. मागच्या ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आणि विदर्भ मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं अतोनात नुकसान झालं आहे.


कुठे कुठे पावसाचा अलर्ट


हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २० आणि २१ मार्च हे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या सरी बरसतील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील भागांतही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.


शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा


हा पाऊस २० मार्चपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता असून, २१ मार्चपासून हवामान पुन्हा कोरडे होईल. मात्र, या काळात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. काही भागांत गारपिटीची शक्यता असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


का बदलतंय हवामान?


सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या परिसरात एक शक्तिशाली वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्याचा प्रभाव थेट मध्य भारतापर्यंत जाणवत असून, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २० मार्चपासून देशभरातील १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाला सुरुवात होईल. वारे ताशी ७० ते ८५ किलोमीटर वेगाने वाहू शकतात. उत्तर ते पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या भागांवर परिणाम करेल. शेतकऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.


महाराष्ट्रात कुठे किती नुकसान?


पाचगणी शहर आणि परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालं. तर गव्हालाही पावसाचा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वझर सरकटे गाव परिसरात गारपीट झाली. तर तळणी मंडळात मुसळधार पाऊस झाला.


पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालं. जालना शहरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे, पेरेजपूर परिसराला बसला. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं.

Comments
Add Comment

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले