पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बस महामार्गाच्या कडेला जाऊन थेट उलटली. मात्र, या भीषण अपघातात नियतीने साथ दिली आणि बसमधील ४४ प्रवासी मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले.


मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे ही एसटी बस आपल्या मार्गाने जात असताना एका भरधाव कंटेनरने चालकाच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंटेनरची एसटीला इतकी जोरात धडक बसली की एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. बसच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.


अपघात होताच प्रवासी किंचाळले घाबरले. बस पलटी झाल्याचे पाहताच जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसच्या खिडक्यांमधून आणि दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ २ ते ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ४४ जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचला.


पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, ज्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. अशातच अवजड वाहनांची ओव्हरटेक करण्याची घाई प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. पाटस परिसरात झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कंटेनर चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून