बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असा कयास बांधला जात असताना, काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार गट ही निवडणूक लढवणार नसेल, तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, आमच्याकडे पर्याय तयार आहे, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.


महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. सपकाळ म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती. त्यामुळे पोटनिवडणूक लढवण्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ते जर लढत नसतील, तर आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. अंतिम निर्णय हा महाविकास आघाडी घेईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, ६ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.


राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उमेदवार असतील, हे निश्चित आहे. त्याचबरोबर काँग्रेससह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही ही पोटनिवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. “सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे आणि बारामतीत पवार घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार द्यावा”, असे हाके म्हणाले.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

Asha Bhosle Heart Attack : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात