रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी आणि ....; आयटमाइज्ड बिल मागितले आणि धक्कादायक वास्तव समोर

नवी दिल्ली: वैद्यकीय उपचारांनंतर रुग्णालयाकडून येणारे बिल डोळे झाकून भरणाऱ्यांसाठी ही बातमी डोळे उघडणारी आहे. एका रुग्णाने जानेवारी महिन्यात एका रुग्णालयात उपचार घेतले होते. सुरुवातीला विमा वजा जाता या रुग्णाला १ लाख रुपयांचे बिल देण्यात आले. मात्र, केवळ एका सल्ल्यामुळे या रुग्णाने 'आयटमाइज्ड बिल' मागितले आणि धक्कादायक वास्तव समोर आले.


अशा पकडल्या हॉस्पिटलच्या चुका


रुग्णाने जेव्हा सहा पानांचे तपशीलवार बिल तपासले, तेव्हा त्यात अनेक विसंगती आढळल्या. रुग्णाला 'ॲनेस्थेसिया कन्सल्टेशन'साठी (भूलतज्ज्ञ सल्ला) ३१,४३० रुपयांचा चार्ज लावला होता, जो प्रत्यक्षात कधी झालाच नव्हता. उपचारांसाठी लागणाऱ्या एका 'सप्लाय किट'चे पैसे दोनदा आकारण्यात आले होते. जेव्हा ही बाब बिलिंग विभागाच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा अवघ्या दोन आठवड्यांत हे शुल्क काढून टाकण्यात आले आणि बिल १ लाखावरून थेट ५७००० रुपयांवर आले.


सोशल मीडियावर संताप


ही घटना व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. अनेक युजर्सच्या मते, रुग्णालये मुद्दाम अशा चुका करतात कारण त्यांना माहित असते की लोक तपशील तपासणार नाहीत. "विमा कंपन्या प्रीमियम वाढवण्यासाठी भांडतात, पण रुग्णालये जेव्हा तुमची फसवणूक करतात तेव्हा ते गप्प का बसतात?" असा सवाल एका युजरने उपस्थित केला. सरकारी देखरेखीच्या अभावामुळे रुग्णालये निर्ढावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


बिल भरण्यापूर्वी 'हे' नक्की करा


फक्त एकूण रकमेची 'समरी' न घेता, प्रत्येक गोळी आणि प्रत्येक सुईचा हिशोब असलेले 'आयटमाइज्ड बिल' मागा.
डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आणि बिलात लावलेले चार्जेस याची तुलना करा.
बिलात एखादी गोष्ट समजली नाही, तर त्वरित बिलिंग विभागाला विचारणा करा.
आयटमाइज्ड बिल मागितल्यामुळे अनेकदा बिलात १५ ते २० टक्क्यांची कपात होते. कारण अनेक अनावश्यक चार्जेस हॉस्पिटलकडून स्वतःहून काढून टाकले जातात.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना

Jalgaon Crime : ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच, स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार

Health Tips : शरीराला एका दिवसात किती तेलाची गरज असते? जाणून घ्या योग्य प्रमाण, अन्यथा होतील भयंकर आजार

भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला फोडणी देण्यापासून ते पराठे आणि तळलेले पदार्थ

Yaad Lagla Song Release : आकाश यादव - पूजा चव्हाण यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना