Karachi Natural Disaster : काराचीवर नैसर्गिक संकट; वादळामुळे १९ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराची शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी-वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. पाऊस आणि वादळामुळे झालेल्या मृत्यूंनंतर शहर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


बुधवारी (१८ मार्च) रात्री कराचीमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली आणि भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडे आणि साइनबोर्ड पडले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. अशातच पाकिस्तान हवामान विभागाने गुरुवारी आणखी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.


काराचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संघार मलिक यांनी सांगितले की, वादळादरम्यान छत आणि भिंत कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे लोक चहा पित बसले होते. त्यांनी सांगितले, “वादळ, जोरदार वारे आणि पावसामुळे सईदाबाद परिसरातील मोचको गोठ येथेही एक इमारत कोसळली आहे.”


पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव पथक अद्याप ढिगारा हटवण्याचे काम करत असून मलब्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे.
कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी खराब हवामान लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच राहावे आणि विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.


अहवालानुसार, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. हवामान विभागाने सिंध प्रांतातील इतर भागांमध्येही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

होर्मुझवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींची कुवेतच्या युवराजांशी चर्चा; प्रादेशिक शांततेवर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून

आर्थिक संकटातही पाकिस्तान तयार करतोय अण्वस्त्र ; पहिल्यांदाच अमेरिकेने केले पाकिस्तानवर थेट आरोप

- पाकिस्तानकडून अमेरिकेला थेट धोका निर्माण होणार ? इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक

इस्रायलचा मोठ्या गॅस फिल्डवर हल्ला, खवळलेल्या इराणकडून आखाती देशांमधील तेल आणि वायू केंद्रांना लक्ष्य

तेहरान: मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून बुधवारी इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या 'साऊथ पार्स'

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण