शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे 'धुरंधर २'

मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे असे मत प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले आहे.





'धुरंधर २' च्या निमित्ताने नवीन चित्रपटयुगाचा जन्म आहे. आणि चित्रपटसृष्टीच्या पूर्वीच्या जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा हा निर्दयी अंत आहे. आता 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्पेलिंगसुद्धा आदित्य धर असे असेल. आणि स्टीव्हन स्पीलबर्ग व क्रिस्टोफर नोलन यांनी आपली सर्व कामे सोडून 'धुरंधर २' चा प्रदर्शनाच्या दिवशीचा पहिला शो पाहणे हेच शहाणपणाचे आणि योग्य ठरेल; या शब्दात प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक्स पोस्ट (ट्विटर) करून 'धुरंधर २'चे कौतुक केले. याआधी 'धुरंधर २' मधील 'आरी आरी' या गाण्याच्या लाँचवेळी खरे धुरंधर हे प्रेक्षक असल्याचे मत अभिनेत्री साराने व्यक्त केले होते.


राम गोपाल वर्मा हा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तसेच नवनवे धाडसी प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने हिंदी, कन्नड, तेलुगु भाषेच चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, फिल्मफेअर, दाक्षिणात्य फिल्मफेअर, आय.आय.एफ.ए. असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले आहेत. शिवा, रंगीला, सत्या, शूल, जंगल, कंपनी, भूत, अब तक छप्पन, सरकार हे राम गोपाल वर्माचे प्रचंड लोकप्रिय झालेले निवडक चित्रपट आहेत.

Comments
Add Comment

नोराच्या 'सरके चुनर'वर कंगना रणौत यांची परखड टीका; हे गाणे सर्व मर्यादा ओलांडत...

मुंबई: रॅपर बादशाहच्या 'तेत्तिरी' गाण्यानंतर आता नोरा फतेही आणि संजय दत्त यांचे 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे वादात

'धुरंधर २' ला २१ कट्स, 'ए' प्रमाणपत्र; जाणून घ्या चित्रपटाची लांबी आणि बदल

मुंबई: रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

मुंबई हायकोर्टाकडून शिल्पा शेट्टीला दिलासा, फोटोबाबत कोर्टात मोठा युक्तीवाद

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आज

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते.

अभिनेत्री दिपिका कक्कड भावूक, आरोग्याविषयी व्यक्त केली चिंता

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड हिला २०२५ मध्ये आपल्याला कॅन्सर असल्याचे समजले. नुकताच यासंबधित