Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. मात्र, एअर इंडिया एक्सप्रेसची अबू धाबी, रास अल खैमाह आणि शारजाहसाठी नियोजित उड्डाणे पूर्ववत सुरू राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.


एअर इंडियाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे, “दुबईमधील उड्डाण संचालन तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने येणारी आणि जाणारी सर्व उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. त्यामुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची दुबईकडे जाणारी व तेथून येणारी आजची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.”


दरम्यान, तिरुवनंतपुरमहून दुबईकडे जाणारे एमिरेट्स एअरलाईन्सचे एक विमान सोमवारी गंतव्य विमानतळावर सुरक्षा संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर परत फिरले. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद झाल्यानंतर एमिरेट्सची टीआरव्ही-डीएक्सबी उड्डाण सेवा मध्य मार्गातूनच परत आली. हे विमान पुन्हा तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.या विमानात ३५३ प्रवासी आणि १९ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हे विमान पहाटे ४.४० वाजता रवाना झाले होते आणि सकाळी ८.४० वाजता परतले. प्रवाशांना टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


यापूर्वी, एमिरेट्सचेच ईके५३३ हे दुसरे उड्डाण पहाटे ४.३० वाजता कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३२५ प्रवाशांना घेऊन दुबईकडे रवाना झाले होते. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अचानक बंद झाल्याने हे विमानही परत फिरले आणि कोची विमानतळावर उतरवण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ड्रोनशी संबंधित घटनेमुळे आग लागली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. दुबई पोलिसांनी एअरपोर्ट रोड आणि एअरपोर्ट टनेल सध्या बंद असल्याचे सांगितले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरात आपत्कालीन मदत आणि बचावकार्य सुरू असून वाहतूक त्या भागातून वळविण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार

Iran-US-Israel War : चीनकडून सर्व देशांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि हॉर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनने सर्व

पाकिस्तानने केला अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० लोकांचा मृत्यू २५० हून अधिक जखमी; राशिद खानकडून संताप व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर

होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून नाटो फुटणार, ट्रम्पचा इशारा

होर्मुज सामुद्रधुनीची सुरक्षा करण्यासाठी नाटोने मदत केली नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात येईल -

आता X वर २८० कॅरेक्टरपलीकडे लिहता येणार; X च नवीन फीचर लाँच

- X वर मिळणार लांबलचक पोस्ट लिहिण्याची संधी सॅन फ्रान्सिस्को : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (Twitter) ने आता

इंस्टाग्रामची मोठी अपडेट; डीएम्सच फिचर होणार बंद?

कॅलिफोर्निया : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल समोर आला आहे.