Monday, March 16, 2026

Television Actress : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

Television Actress  : टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या 'या' अभिनेत्री घेतात बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त मानधन; कमाई ऐकून व्हाल थक्क

अनेकदा आपल्या असं वाटतं की बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकतात त्यामुळे त्यांची कमाई फार जास्त असते. मात्र, फार कमी लोकांना हे माहित आहे की हिंदी टेलिव्हिजन विश्वातील काही अभिनेत्री याबातीत बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील मागे टाकतात.

टेलिव्हिजनवर झळकणाऱ्या अभिनेत्री आपल्या करिअरमध्ये लाखोंची कमाई करतात. तसेच, त्यांची प्रसिद्धी आणि चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात असतो. चला तर जाणून घेऊयात या काही प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल.

अभिनेत्री रुपाली गांगुली :

ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध असून गेल्या ६ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. रुपाली गांगूली ही मालिकेच्या एका एपिसोडसाठी ३ लाख रुपयांचं मानधन घेत असल्याची माहिती आहे.

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश :

हिंदी टेलिव्हिजन विश्वात नागिन या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाशदेखील लाखो रुपयांचं मानधन घेते असल्याची माहिती असून मास्टर शेफसाठी तेजस्वी एका एपिसोडचे २ लाख रुपयांचं मानधन घेत असल्याची माहिती आहे.

स्मृती ईरानी :

अभिनेत्री स्मृती ईरानी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

अंकिता लोखंडे :

अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री असून अंकिता लोखंडे एका एपिसोडसाठी २.५ ते ३ लाख रुपयांपर्यंतचे मानधन घेत असल्याची माहिती आहे.

जन्नत जुबेर :

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात असलेली अभिनेत्री जन्नत जुबेरदेखील सर्वात जास्त मानधन घेत असून जन्नतचा चाहता वर्ग प्रचंड आहे. अभिनेत्री जन्नतदेखील एका एपिसोडसाठी २ लाख रुपयांचं मानधन घेते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा