BMC महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, विधी समितीच्या अध्यक्षपदी दीक्षा कारकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा मकवाना यांची तर विधी समितीच्या अध्यक्षपदी दीक्षा कारकर, उपाध्यक्षपदी अनिष मकवानी यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि विधी समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक सोमवारी १६ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.


महिला व बालकल्याण समिती आणि विधी समितीच्या अध्यक्ष तसेच उप अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या मीनल संजय तुर्डे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या रिटा भरत मकवाना यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.


विधी समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या दीक्षा हर्षद कारकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे अनिष मकवानी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समिती आणि विधी समितीचे सदस्य उपस्थित होते.


महिला व बालकल्याण समिती आणि विधी समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अनुक्रमे महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी उप आयुक्त (सामन्य प्रशासन) किशोर गांधी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य