नायगाव बीडीडी चाळीतील ८६४ कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण

- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वितरण; १६० चौ.फुटांच्या खोलीत आयुष्य काढलेल्यांना मिळाले ५०० चौ.फुटांचे घर


मुंबई : नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ८६४ कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरांच्या चाव्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पुनर्वसन सदनिकांच्या या वितरण सोहळ्यात, अनेक वर्षांपासून चांगल्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी ८० वर्षीय शोभा गायकवाड यांना घराची पहिली चावी सुपूर्द केली, त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.


या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनेक दशकांपासून बीडीडी चाळीतील रहिवासी १६० चौरस फुटांच्या अतिशय लहान आणि जीर्ण झालेल्या घरांमध्ये कठीण परिस्थितीत राहत होते. आता त्यांना ५०० चौरस फुटांचे अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त घर देण्यात आले आहे.


हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. ६.४५ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या तळ अधिक तीन मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये सध्या ३ हजार ३४४ भाडेकरू वास्तव्यास असून, त्यांचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्पात प्लॉट 'ब' मधील १ हजार ४०१ रहिवाशांना पहिल्या टप्प्यात पुनर्वसित करण्यात येणार आहे. त्यापैकी ८ इमारतींमधील ५ इमारतींमधील ८६४ सदनिकांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, एप्रिल २०२६ पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


प्लॉट 'अ' मधील १९ चाळींच्या जागेवर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती प्रस्तावित आहेत, त्यापैकी ३ इमारतींचे काम सध्या सुरू आहे. पुनर्वसनाधीन रहिवाशांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांना भाडे किंवा संक्रमण गाळा निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, प्रति महिना २५ हजार रुपये याप्रमाणे ११ महिन्यांचे आगाऊ भाडेही दिले जात आहे.



आधुनिक घरांची वैशिष्ट्ये :


- दोन ते तीन पिढ्यांपासून लहान घरात राहणाऱ्या कुटुंबांना आता ५०० चौरस फुटांचे २ बीएचके घर मिळाले आहे. या नव्या इमारतींमध्ये व्हिट्रीफाईड फरशा, अॅल्युमिनियम खिडक्या, ग्रॅनाइट स्वयंपाक ओटा, अग्निरोधक यंत्रणा, ब्रँडेड प्लंबिंग, दोन प्रवासी लिफ्ट, एक अग्निशमन लिफ्ट, प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही, बेसमेंट पार्किंग आणि भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे.


- या प्रकल्पाअंतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहत उभारली जात आहे. यामध्ये शाळा, वेलफेअर सेंटर, मलनिस्सारण प्रकल्प, सौरऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संकलन यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. विशेष म्हणजे, इमारतींच्या सामायिक सुविधांची देखभाल 'म्हाडा'कडून पुढील १२ वर्षांसाठी केली जाणार आहे, त्यामुळे रहिवाशांवर देखभाल खर्चाचा (मेन्टेनन्स) भार पडणार नाही.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य