Donald Trump : राष्ट्राध्यक्ष ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; चीन, जपान, ब्रिटनकडे अमेरिकेची मदतीची हाक

- होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेचे अनेक देशांना आवाहन


अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाचा आज १६वा दिवस असून होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी बलाढ्य अमेरिकेला आता इतर देशांच्या मदतीची गरज भासते आहे. अमेरिकेने चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांकडून मदतीची अपेक्षा केली आहे.



सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे : डोनाल्ड ट्रम्प


ट्रम्प यांनी सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठा होतो. त्यामुळे या सागरी मार्गाच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित देशांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांनी असा दावाही केला की अलीकडील हल्ल्यांनंतर इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र ड्रोन, समुद्री खाणी आणि कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे अद्याप धोका कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.


दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून जागतिक तेल वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गातून होतो. दुसरीकडे, इराणने मित्रदेशांना आश्वासन देत या सामुद्रधुनीत अडथळा निर्माण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले आहे.


याचदरम्यान एलपीजी वाहून नेणारी दोन भारतीय जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताकडे रवाना झाली आहेत. जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वजांकित एलपीजी वाहक शिवालिक आणि नंदा देवी यांनी शनिवारी हा मार्ग पार केला. ही दोन्ही जहाजे मिळून सुमारे ९२,७०० टन एलपीजी घेऊन भारतात येत आहेत.


Comments
Add Comment

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल

Middle East War : मध्य-पूर्व आशियातील युद्धामुळे युक्रेनवरील अमेरिकेचा वरदहस्त कमी होणार ?

 झेलेन्स्की यांना व्यक्त केली भीती कीव : पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येत असून संपूर्ण

पश्चिम आशियात युद्ध तीव्र; इस्रायलचे इराण-लेबनॉनमध्ये मोठे हवाई हल्ले

जेरुसलेम : पश्चिम आशियामध्ये अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या इराणच्या युद्धाला पाच आठवड्यांहून अधिक काळ

US found Pilot: अमेरिकेने दुसऱ्या एफ-१५ई पायलटला काढले शोधून, इराणच्या गोळीबारातून केली सुटका

नवी दिल्ली: अमेरिकेने एका जमिनीवरील कारवाईत आपल्या दुसऱ्या वैमानिकाला वाचवले आहे. इराणने लष्करी कारवाईदरम्यान

Iran: इराणचे ट्रम्प यांच्या अल्टिमेटकडे दुर्लक्ष; इराणी लष्करी जनरल म्हणाले, "अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडले जातील"

नवी दिल्ली: इराणच्या केंद्रीय लष्करी कमांडने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या आत करार

Donald Trump: ट्रम्प आक्रमक, इराणला करून दिली ६ एप्रिलच्या अंतिम मुदतीची आठवण; '४८ तासांत इराणवर...'

नवी दिल्ली: इराणविरुद्धच्या अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईला ३६ दिवस पूर्ण झाले आहेत . एक महिन्याहून