कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९ कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून उद्योग व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.


कोल्हापूरातील एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर


 

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात राष्ट्रीय महामार्ग-४८ वर दोन्ही बाजूस ३-लेन कॉंक्रीट सर्व्हिस रस्त्यासह ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठी ३५७.९९ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-४८ हा भारताच्या गोल्डन क्वाड्रिलॅटरल (GQ) महामार्ग नेटवर्कमधील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून तो दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई या प्रमुख शहरांना जोडतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ५-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात व्यापार व उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असून प्रचंड वाहतूक कोंडी व प्रदूषणातही वाढ होत आहे. याचा परिणाम आपातकालीन सेवांवर देखील होत आहे.

उपरोक्त मंजूर करण्यात आलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब अंतराची जलद वाहतूक वेगळी होणार असून स्थानिक वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी व मालवाहतुकीसाठी गतीमान व सुरक्षित प्रवास शक्य होईल. तसेच इंधन बचत होऊन प्रवासाचा वेळही कमी होईल. परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या उन्नत महामार्गामुळे या भागातील उत्पादकता वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल व आपातकालीन सेवा कार्यक्षमतेने पुरवता येतील. यामुळे देशांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल.
Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी