स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये प्लास्टिक बॉटल्समधून पाणी देण्याऐवजी काचेच्या बॉटल्समधून पाणी देण्याची सूचनाच महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांकरता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स पुरवल्या जातात. प्रत्येक सदस्यांच्या समोर टेबलवर मिनरल वॉटरच्या प्लास्टिक बॉटल्स ठेवल्या जातात. मात्र, याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत यापुढे प्रत्येक सभांमध्ये सदस्यांना पुरवले जाणारे पाण्याचा बॉटल्स त्वरीत बंद करण्यात याव्या. या प्लास्टिक बॉटल्समधून पाणी न पुरवता महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून ज्या काचेच्या बॉटल्स उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या बॉटल्समधून सदस्यांना पाणी दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केली. येत्या पुढील सभांमध्ये काचेच्या बॉटल्स पाणी सदस्यांना दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी याची दखल प्रशासनाने घेऊन याची त्वरीत कार्यवाही केली जावी असे आदेश दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स आता बाद झालेल्या दिसतील.
Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या