महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी पळण्याची शक्यता आहे. पोषक आहारअंतर्गत खिचडीचा पुरवठा करणाऱ्या संस्थांना गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असून या संस्थांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी शासनासोबत महापालिकेचा पाठपुरावा सुरु झाला आहे. त्यामुळे सध्या जरी कुठल्याही शाळांमध्ये ही समस्या निर्माण झालेली नसली तर भविष्यात नव्याने सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत, संस्थांना अपवादात्मक परिस्थितीत फळे वाटप करण्याचा सूचना केली जाण्याची शक्यता आहे. संस्थांना तशाप्रकारच्या सूचना दिल्या जातील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


मुंबई महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक तसेच खासगी प्राथमिक शाळांमधील मुलांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राबवण्यात येत असून यामाध्यमातून मुलांना मधल्या सुट्टीमध्ये खिचडी तसेच इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. मुंबई महापालिकेच्या खासगी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच खासगी अनुदानित शाळांमधील सुमारे पाच लाखांहून अधिक मुलांना या पोषक आहाराचा लाभ दिला जातो.


महापालिका शाळांमध्ये गरीब घरातील मुले शिकत असल्यामुळे त्यांना मधल्या सुटीमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. या मध्यान्ह भोजन अंतर्गत पोषक आहाराचा पुरवठा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या संस्थांच्या माध्यमातून याचे वाटप केले जात असले तरी सध्या देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईतही याची झळ बसण्याची शक्यता आहे. परिणामी महापालिका शाळा आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याची चर्चा ऐकायला येत आहे.तसेच अनेक ठिकाणी संस्थांनी गॅस सिलिंडर अभावी खिचडी वाटप करणे बंद केले असल्याचीही चर्चा आहे.


मात्र, मुंबई महापालिका शाळांमध्ये सध्या तरी अशाप्रकारे मध्यान्ह भोजनचा पुरवठा बंद करणे अशाप्रकारची घटना घडलेली नाही.तसेच कोणत्यही संस्थेने पुरवठा सिलिंडर अभावी करता येणार नाही असेही शिक्षण विभागाला कळवलेलेे नाही. त्यामुळे सध्या तरी महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहार मिळणे बंद झालेला नाही. त्यामुळे जर हा आहार बंद करण्याबाबत संस्थांकडून तशी तक्रारी आल्यास शासनाला कळवले जाईल आणि शासनाच्या माध्यमातून सिलिंडर उपलब्ध करून दिला जाईल. पण सिलिंडरमुळे पोषक आहार मिळणे बंद झालेला आहे,असे कुठल्याही महापालिका शाळांमध्ये घडलेले नसून जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर सिलिंडरची सुविधा उपलब्ध होईपर्यंत फळ वाटप करण्यात येईल,तशा सूचना संस्थांना केल्या जातील असे महापलिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका शाळांमध्ये पोषक आहार सिलिंडर उपलब्ध न झाल्यामुळे मिळू न शकण्याची स्थिती असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार मी याबाबत अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना याची कल्पना देवून पोषक आहार पुरवणाऱ्या संस्थांना सिलिंडर उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने याबाबत आपण आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना केल्या. त्यानुसार ढाकणे यांनी रेशनिंग कंट्रोलर यांच्याशी चर्चा करून संबंधित संस्थांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानुसार या संस्थांना सिलिंडर उपलब्ध होईलच. पण तशीच जर काही परिस्थिती निर्माण झाली तर मुले उपाशी राहू नये यासाठी फळे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण हा निर्णय अपवादात्मक परिस्थितीमध्ये घेण्यात येईल अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या