सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा मागवली असली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. या नालेसफाईच्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून अडवणूक करण्याचे काम काही कंत्राटदारांकडून केले जात आहे का अशी शंका आहे. त्यामुळे निविदा अटींमध्ये बदल करून यामध्ये अनुभवीसह अननुभवी कंत्राटदार कंपनीही निविदा भरुन नालेसफाईचे काम मिळवू शकते. यामाध्यमातून प्रस्थापित नालेसफाईच्या कामांसाठीच्या कंत्राटदारांचे रॅकेट मोडीत काढले जाणार आहे. आणि भविष्यात अननुभवी कंपनीला जरी काम मिळाले तरी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे त्यांच्याकडून योग्यप्रकारे सफाईचे काम करून घेतील. यासाठी आता आयआयटी मुंबईकडून नालेसफाईच्या कामांचे ऑडीट केले जाणार असल्याचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले. कंत्राटदारांनी कितीही अडवणूक केली तरी मुंबई साफ करण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही याच कंत्राटदारांकडू काम पूर्ण करून दाखवणार असा विश्वास वजा निर्धार मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संयुक्तपणे व्यक्त केला आहे.


मुंबईतील मोठ्या आणि छोट्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाईच्या कामांसाठी दोन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. सर्व कामांमध्ये काही नियुक्त कंत्राटदार कंपन्या या मिठी नदी घोटाळ्याचा ठपका ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे या बाद झालेल्या कंपनीच्या जागीन नव्याने निविदा प्रक्रिया सुरु आहे. तर काही नाल्यांच्या सफाईसाठी कंत्राटदार नियुक्त असूनही त्यांनी १ मार्चपासून कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे मुंबई महापौर रितू तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अभिजित बांगर आणि अविनाश ढाकणे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभिंयता व इतर अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीमध्ये प्रशासनाकडून छोट्या आणि मोठ्या नाल्यासह मिठी नदीतील गाळ साफ करण्यासाठी नियुक्त कंत्राटदार आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या सफाईच्या कामाची माहिती घेण्यात आली. यावेळी भाजपच्या तिन्ही सदस्यांनी प्रश्नांची सरबती करताच प्रशासनाची पळताभूई थोडी झाली.


यानंतर माध्यमांशी बोलतांना महापौर रितू तावडे यांनी या मिठी नदीच्या सफाई कामात कंत्राटदार कंपनी पुढे येत नाही वस्तूस्थिती आहे. पण १७ मार्च पर्यंत प्रशासन यावर आपला निर्णय जाहीर करणार आहे. यामध्ये काही कंत्राटदार प्रशासनाची अडवणूक करत असल्यामुळे यासाठी असलेल्या निविदेतील अटी बदण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे अनुभवी कंत्राट कंपनीसह अननुभवी कंपनीही यामध्ये भाग घेवू शकते. त्यामुळे या अननुभवी कंपनीकडून प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी काम करून घेतील. पण या माध्यमातून आम्ही नालेसफाईच्या कामांमधील प्रस्थापित रॅकेटच मोडित काढणार आहे.


महापालिका प्रशासनाने यापूर्वी काम केले असले तरी आता महायुतीची सत्ता आहे.त्यामुळे महायुती ऍक्शन मोडवर आहे. त्यामुळे कंत्राटदाराने किती अडवणूक केली तरी नाले साफ करण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही याच कंत्राटदारांकडून काम करून घेवू. महायुतीचे नगरसेवक या सफाईसाठी रस्त्यावर दिसतील. मुंबईच्या हितासाठी नक्कीच आम्ही काम करू.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य