मॅच फिक्सिंग प्रकरणात ICC ची मोठी कारवाई; वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मॅच फिक्सिंग आणि गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी कठोर कारवाई करत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू जेव्हॉन सिअरल्स तसेच दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घातली आहे. या कारवाईत टायटन्स संघाचे मालक चित्तरंजन राठोड आणि ब्रिम१० स्पर्धेत सहभागी असलेल्या संघाचे अधिकारी ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांचाही समावेश आहे.


२०२३-२४ हंगामात झालेल्या ब्रिम१० स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आयसीसीने तिघांनाही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले असून त्यांना १४ दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


आयसीसी आणि क्रिकेट वेस्ट इंडिज यांनी त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटच्या मदतीने या प्रकरणाची चौकशी केली. ब्रिम१० स्पर्धा क्रिकेट वेस्ट इंडिजच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित भ्रष्टाचारविरोधी युनिटनेच तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.


या प्रकरणात ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांच्यावर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. चित्तरंजन राठोड यांच्यावर तीन, जेव्हॉन सिअरल्स यांच्यावर चार तर ट्रेव्हॉन ग्रिफिथ यांच्यावर पाच वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहेत.


क्रिकेट वेस्ट इंडिजच्या आचारसंहितेतील कलम २.१.१ अंतर्गत तिघांवर मॅच फिक्सिंगचे आरोप आहेत. याशिवाय कलम २.१.४ चे उल्लंघन करत इतरांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे किंवा मदत केल्याचा आरोपही आहे. तसेच कलम २.४.४ अंतर्गत चौकशीदरम्यान भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्याचेही आढळले आहे.


याशिवाय सिअरल्स आणि ग्रिफिथ यांच्यावर कलम २.४.२ चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती न देणे समाविष्ट आहे. दरम्यान, आयसीसी संहितेच्या कलम २.४.७ अंतर्गत ग्रिफिथ यांच्यावर चौकशीत अडथळा आणणे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा गंभीर आरोपही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आयसीसी स्वतंत्र कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या