शेअर बाजार जोरात आपटला

मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध लांबण्याची शक्यता वाढल्यामुळे बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीत बुधवारी ११ मार्च २०२६ रोजी सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली. आता सेन्सेक्स ५९०.६३ अंकांनी घसरून ७७,६१५.३५ वर आला आहे. याआधी मंगळवारी संध्याकाळी सेन्सेक्स ७८,२०५.९८ वर बंद झाला होता. तसेच निफ्टी फिफ्टीमध्येही घसरण दिसून आली. निफ्टी फिफ्टी हा १७७.३५ अंकांनी घसरून २४,०८४.२५ वर आला आहे. याआधी मंगळवारी निफ्टी फिफ्टी २४,२६१.६० वर बंद झाला होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी साडेचार हजार कोटीं रुपयांपेक्षा जास्त विक्री केल्यामुळे बाजार आपटला. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६,३३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ खरेदी केली आहे.


मुंबईत २४ कॅरेट शुद्ध असलेल्या दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर १,६३,३१० रुपये आहे जो मंगळवारी १,६२,३८० रुपये होता. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध असलेल्या दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात ९३० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत २२ कॅरेट शुद्ध असलेल्या दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर १,४९,७०० रुपये आहे जो मंगळवारी १,४८,८५० रुपये होता. मुंबईत २२ कॅरेट शुद्ध असलेल्या दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याच्या दरात ८५० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत एक किलो चांदीचा दर २,९०,००० रुपये आहे जो मंगळवारीही तेवढाच होता. चांदीच्या दरात बदल झालेला नाही.

Comments
Add Comment

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Iran US War Ceasefire : मोठी बातमी : अखेर युद्धाला 'पूर्णविराम'! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवडे शांततेचा करार

 डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर

RR vs MI : राजस्थानचा 'रॉयल' धमाका! मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप!

गुवाहाटी : आयपीएलच्या १९ व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि