हैद्राबादहून निघालेल्या विमानाचा अपघात; चाक निखळले अन् १३३ जणांचे प्राण...

फुकेत : हैद्राबादहून थायलंडकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगदरम्यान गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे उतरताना विमानाचे नोज व्हील निकामी झाले अन विमानात असलेल्या १३३ जणांचे जीव टांगणीला लागले.



लँडिंगवेळी अचानक बिघाड


मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया फ्लाईट IX938 ने बुधवारी सकाळी ६:४२ वाजता राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथून उड्डाण केले होते. नियोजित वेळेनुसार हे विमान सकाळी ११:४० वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र, लँडिंगच्या वेळी विमानाचे नोज व्हील अचानक निकामी झाले ज्यामुळे वैमानिकांना विमान धावपट्टीवर नियंत्रित करणे कठीण झाले. नोज व्हील हा विमानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण त्याच्या मदतीने रनवेवर विमानाचे दिशा नियंत्रण केले जाते.



प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण


विमान रनवेवर थांबून राहिल्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक धूर दिसल्याने अनेक प्रवासी घाबरले होते. मात्र विमानातील क्रू मेंबर्सने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानाबाहेर उतरवण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



विमानतळावरील सेवा विस्कळीत


या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून फुकेत विमानतळावरील काही काळ उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली. विमान रनवेच्या मध्यभागी अडकल्याने इतर विमानांच्या हालचालींवरही परिणाम झाला. जोपर्यंत हे विमान धावपट्टीवरून हटवले जात नाही, तोपर्यंत विमानतळावरील सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यास वेळ लागू शकतो. दरम्यान, काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले असून अनेक प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : पाकिस्तानकडून आलेल्या युध्दविरामाच्या प्रस्तावाला इराणने दाखवली केराची टोपली

इराणने पाकिस्तानकडून मांडण्यात आलेल्या १५ मुद्द्यांच्या शांतता प्रस्तावाला नकार (Iran-US-Israel War) दिला आहे. परराष्ट्र

Iran-US-Israel War : अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे (Iran-US-Israel War) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या

Green Asha Indian Ship : भारताचे आठवे जहाज २० हजार टन एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर

भारताचे आठवे जहाज ‘ग्रीन आशा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय

अमेरिकेच्या लष्कराने इराणमध्ये केला स्वतःच्याच विमानांवर हल्ला; कारण काय आणि किती नुकसान झाले?

नवी दिल्ली: अमेरिकेने इराणमधून आपल्या लढाऊ वैमानिकांना परत आणण्यासाठी एक जोखमीची बचाव मोहीम सुरू केली होती.

Iran-US-Israel War : ४५ दिवसांचा युद्धविराम होणार? अमेरिका - इराण एकमेकांच्या अटी मान्य करणार?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता युद्धविराम (सीजफायर) होण्याची शक्यता व्यक्त केली जात

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल