Wednesday, March 11, 2026

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी ०३.१५ वाजेपर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशन कामासाठी बंद राहील

मुंबई पीआरएस दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ ते दिनांक १३.०३.२०२६ रोजी ०३.१५ वाजेपर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशनच्या कामासाठी बंद राहील. या सेवा बंद राहिल्यामुळे, वरील कालावधीत खालील सेवा उपलब्ध राहणार नाहीत:

• प्रवासी आरक्षण प्रणाली • कोचिंग रिफंड • चार्ट तयार करण्याची प्रक्रिया • ट्रेन फायरिंग / ट्रेन डेटा प्रक्रिया • आयव्हीआरएस सेवा • करंट आरक्षण • चार्ट डिस्प्ले • टच स्क्रीन सेवा • रिफंड काउंटर्स • कोचिंग रिफंड टर्मिनल

तथापि, विद्यमान परतावा नियमांनुसार परतफेडीसाठी टीडीआर जारी केला जाईल. वरील कालावधीत मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध राहणार नाही.प्रवाशांना/रेल्वे वापरकर्त्यांना या महत्त्वाच्या देखभालीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >