भाजपाच्या हाती मुंबईकरांचे आरोग्य; सहा विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सहा विशेष समिती अध्यक्षपदासाठी अखेर भाजप आणि शिवसेनेच्यावतीने उमेदवारांची नावे जाहीर झाली असून दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज महापालिका सचिवांना सादर केले. विशेष म्हणजे आरोग्य समिती , बाजार व उद्यान समिती आणि स्थापत्य (उपनगरे)समिती ही भाजपकडे असून उर्वरीत महिला बाल कल्याण समिती, विधी व महसूल समिती तसेच स्थापत्य (शहर) समिती शिवसेनेकडे गेली आहे. महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले असले तरी प्रतिस्पर्धी पक्षाकडून कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने या सहाही समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध होणार आहे. त्यामुळे आरोग्य समिती भाजपकडे गेल्यामुळे मुंबईचे आरोग्य हे आता भाजपच्या हाती आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती , बाजार व उद्यान समिती, स्थापत्य (शहर) समिती, स्थापत्य (उपनगरे)समिती,महिला बाल कल्याण समिती, विधी व महसूल समिती या सहा विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी अर्ज दाखल. यामध्ये आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी चांदिवली विधानसभेतील भाजपचे नगरसेवक हरिष भांदीर्गे यांनी तर विधी व महसूल समिती अध्यक्षपदी दहिसरमधील शिवसेना नगरसेविका दीक्षा हर्षद कारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या हेतल गाला आणि महिला बाल कल्याण समिती अध्यक्षपदी मिनल तुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर स्थापत्य शहर समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता ज्ञानमूर्ती शमा यांनी आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांना सादर केला. तसेच या सर्व समित्यांच्या अध्यक्षपदांबरोबरच उपाध्यक्षपदासाठीही उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिथे भाजपचा अध्यक्ष तिथे शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि शिवसेनेचा अध्यक्ष तिथे भाजपचा उपाध्यक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

स्थापत्य समिती (शहर)


 

अध्यक्ष - यामिनी जाधव

उपाध्यक्ष - अजय पाटील

 

स्थापत्य समिती (उपनगरे)


 

अध्यक्ष - संगिता ज्ञानमूर्ती शर्मा

उपाध्यक्ष - सुरेश आवळे

 

सार्वजनिक आरोग्य समिती


 

अध्यक्ष - हरिष भांदीर्गे

उपाध्यक्ष - रितेश राय

 

विधी समिती


 

अध्यक्ष - दिक्षा कारकर

उपाध्यक्ष - अनिश मकवानी

 

महिला बालकल्याण समिती


 

अध्यक्ष - मिनल तुर्डे

उपाध्यक्ष - रिटा मकवाना

 

बाजार व उद्यान समिती


 

अध्यक्ष - हेतल गाला

उपाध्यक्ष - भास्कर शेट्टी
Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या