शेअर बाजार सोमवारी आपटला आणि मंगळवारी वधारला

मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करणारे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. बीएसई सेन्सेक्स ४८० अंकांपेक्षा जास्त वधारला आणि ७८,०४९ वर पोहोचला तर निफ्टी १३९ अंकांनी वाढून २४,१६८ वर पोहोचला.

सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात घसरण झाली. पण मंगळवारी परिस्थिती एकदम बदलली. ट्रम्प यांनी संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त केल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय येण्याची भीती कमी होण्यास मदत झाली. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ९१ डॉलरपेक्षा कमी झाल्या. यामुळे शेअर बाजाराला सावरण्याची संधी मिळाली.

मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर सोमवारी १,६१,६८० रुपये होता. हा दर ७०० रुपयांनी वाढला आणि मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी १,६२,३८० वर पोहोचला. तसेच मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर सोमवारी १,४८,२०० रुपये होता. हा दर ६५० रुपयांनी वाढला आणि मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी १,४८,८५० वर पोहोचला. मुंबईत एक किलो चांदीचा दर सोमवारी २,८०,००० होता. हा दर १० हजार रुपयांनी वाढला आणि मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी २,९०,००० वर पोहोचला.
Comments
Add Comment

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

Rain Alert: एप्रिलच्या पहिला आठवड्यात १७ राज्यांमध्ये मेघगर्जना होणार

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांमध्ये वातावरणात बदल होत आहेत. यामुळे या आठवड्यात वायव्य भारतात पाऊस सुरू

Gadchiroli Naxal Surrender : गडचिरोलीत ९ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; शस्त्रसाठा जप्त

- छत्तीसगडच्या सुकमा २ मुली नक्षलवादी आल्या शरण गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश

Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

IT Layoffs : आयटी क्षेत्राचा ‘ब्लॅक वेन्सडे’: तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कंपनीकडून मिळालं नारळ!

- सुमारे १२ हजार भारतीय कर्मचाऱ्यांची नोकरी गेली मुंबई : सकाळची शिफ्ट सुरू होण्याआधीच आलेल्या एका ई-मेलने आयटी

Jammu-Kashmir: गांदरबलमध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार

नवी दिल्ली: काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील अरहमा भागात मंगळवारी सुरू झालेली सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील