पुतिन यांच्या विधानाने खळबळ, पुढील ३० दिवसात तेल पुरवठा बंद होणार?

मुंबई: इराण आणि इस्रायलमधील युद्ध तसेच जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तेल संकटाबाबत एक अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. सध्या जगावर तेलाचं मोठं संकट आहे, त्यामुळे पुढील ३० दिवसांत तेल पुरवठा पूर्णपणे बंद होऊ शकतो, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. या विधानामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पुतिन यांनी आपल्या विधानामध्ये 'होर्मुज सामुद्रधुनीचा' विशेष उल्लेख केला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा करणे आता अतिशय कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी तेल वाहतूक बंद होणार, असे पुतिन यांनी स्पष्ट केले. होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग मानला जातो.


पुतिन यांच्या दाव्यानुसार, जर पुढील एका महिन्यात तेल पुरवठा विस्कळीत झाला तर त्याचा थेट परिणाम इंधनाच्या दरांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या देशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः आशियाई आणि युरोपीय देशांची चिंता वाढली आहे, जे आखाती देशांतून होणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून आहेत.



पुतिन यांच्या विधानाचा अर्थ काय?


सध्या जगासमोर असलेल्या विविध संकटांमध्ये आता 'तेल टंचाई' हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते, असे संकेत रशियाने दिले आहेत. आगामी ३० दिवस जागतिक ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, इतर देश यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Trump : तुमचे पेट्रोल-डिझेल तुम्हीच मिळवा, ‘हॉर्मुझ’वरून ट्रम्प यांचा ब्रिटनसह मित्र राष्ट्रांना इशारा

वॉशिंग्टन : ‘जा आणि तुमचे कच्चे तेल (पेट्रोल-डिझेल ) तुम्हीच मिळवा!’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

Donald Trump : फ्लोरिडातील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला आता डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Iran-Israel conflict : मध्य पूर्व युद्धाचा ३२वा दिवस; इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र

तेहरान : मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३२वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या

उटावा : कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे