गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरासमोर गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. नवीन वर्षासाठी संकल्प करून शुभ कार्याची सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो.


यंदा १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षभर त्याचा वापर करण्याची प्रथा आहे.



गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व


पुराणानुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा वाढदिवस मानून गुढी उभारून साजरा केला जातो.


दुसऱ्या कथेनुसार पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्याचारी शकांचा पराभव करून जनतेची मुक्तता केली. त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक सुरू झाला आणि त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नूतन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.


तिसऱ्या मान्यतेनुसार विष्णू यांचा अवतार असलेल्या राम अवताराने रावणाचा पराभव केला. यानंतर राम अयोध्येत परत येत होते त्यावेळी नागरिकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. त्या दिवसाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो.



गुढीपाडव्याची पूजा कशी करावी ?


गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी आणि अंगाला सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढून नवीन कपडे परिधान करावेत.


दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूची काठी स्वच्छ करून तिच्या टोकाला तांबडे किंवा पिवळे कापड, फुलांची माळ आणि त्यावर उलटा कलश ठेवून गुढी उभारावी. काही ठिकाणी गुढीला बत्ताशांची माळही घातली जाते. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात.


यानंतर गुढीची पूजा करावी. कडुनिंबाची कोवळी पाने, जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा यांचे मिश्रण करून ते थोडेसे खाण्याची प्रथा आहे. वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंब खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, असे मानले जाते.


त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचले जाते. गोड पदार्थ खाऊन हा नूतन वर्षाचा दिवस आनंदात साजरा केला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरवण्याची प्रथा आहे.



या दिवशी काय करतात?


गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे, नवीन कामाची सुरुवात करणे आणि शुभ कार्याचा आरंभ करणे अत्यंत मंगल मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

Comments
Add Comment

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

नवी मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि

Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा