जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळाली. भारतीय संघाच्या सलामी जोडीने षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत तडाखेबंद खेळ केला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकात ९८ धावांची भागिदारी केली. त्यात, अभिषेकने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. २१ चेंडूत ५२ धावांची तुफानी खेळी करत अभिषेक पॅव्हेलिनयमध्ये परतला. त्यानंतर, संजूने धुव्वादार फलंदाजी करत आपलेही अर्धशतक पूर्ण केले. संजूला इशानेही तशीच साथ दिली. त्यामुळे, भारताने १५ व्या षटकात २०० धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, १६ व्या षटकात भारताच्या धावगतीला ब्रेक बसला.


जेम्स नीशमने १६ व्या षटकात सामन्याच चित्र पलटवून टाकले, भारत २५०+ धावांच्या दिशेने वेगाने धावत असताना या एकाच षटकात तीन दिग्गज फलंदाजांच्या विकेट पडल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताची धावसंख्या घसरली अन् १६ आणि १७ या दोन षटकांत भारतीय संघाला सर्वात कमी धावा बनवता आल्या. १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नीशमने संजू सॅमसनला आऊट केले, सॅमसनने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर ८९ धावांची तुफानी खेळी केली. मिडऑफच्या वरुन संजूने लगावलेल्या उत्तुंग फटक्याचा बाँड्री लाईनवर झेल टिपला. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर नीशमने ईशान किशनला चॅपमनकडे झेल देण्यास भाग पाडले. ईशानने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. तर, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नीशमने सूर्यकुमार यादवला रचिनच्या हाती झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकले नाही, कर्णधार शून्यावर बाद झाला. त्यामुळे, १५ षटकात २०३ धावा केलेल्या भारतीय संघाची १६ षटकांनंतर ४ बाद २०४ अशी अवस्था झाली होती.


सचिनकडून जेम्सचे कौतुक


भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही ट्विट करत भारतीय फलंदाजांच्या तुफानी खेळीचे कौतुक केले. तर, जेम्स नीशानच्या गोलंदाजीचे कौतुक करायलाही सचिनने मागे पाहिले नाहीत. विशेष म्हणजे, जेम्सच्या षटकात घेण्यात आलेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल अफलातून होते. त्यामध्ये, संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या तिघांचेही झेल सीमारेषेवरच टिपण्यात आले आहेत. सचिनने ट्विट करत या तिन्ही झेलचे कौतुक केले आहे. दरम्यान, भारतीय फलंदाजांच्या धुव्वादार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात २५५ धावांचा डोंगर उभारला.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या