Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान सातत्याने उंचावत आहे. गेल्या दोन वर्षांत भारताने सहा विश्वविजेतेपदे आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमध्ये ही कामगिरी सुरू ठेवली आहे. या काळात युवा क्रिकेटपटूंनीही क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य उज्वल असल्याचे दाखवून दिले आहे. तर वरिष्ठ पुरुष संघाने सातत्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.



पुरुषांचा टी-२० विश्वचषक (२०२४) जिंकला :


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला हतै. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला होता. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा भारताचा दुष्काळ त्याने या निमित्ताने संपवला होता. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक आपलं नाव कोरंल होतं. अंतिम सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारताने २० षटकांत सात विकेट्स गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ विकेट्स गमावून केवळ १६९ धावा करता आल्या.



रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली (२०२५) :


रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली भारताने २०२५ च्या सुरुवातीला न्यूझीलंडला मात देत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. न्यूझीलंडसमोर ५० षटकांत २५२ धावांचे लक्ष्य होते, जे भारतीय संघाने चार विकेट्स शिल्लक असताना साध्य केले. कर्णधार रोहित शर्माच्या ८३ चेंडूत ७६ धावांच्या खेळीमुळे भारताने ४९ षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात २५४ धावा करून विजय मिळवला.



भारतीय महिला अंडर-१९ संघाने ताकद दाखवली :


भारतीय महिला अंडर-१९ संघाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत फक्त ८२ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने ११.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ८४ धावा करून विजेतेपद पटकावले होते.



महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेता (२०२५) :


२०२५ हे वर्ष भारतासाठी खरोखरच संस्मरणीय होते. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला. महिला क्रिकेटमधील ही भारताची पहिली आयसीसी ट्रॉफी होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर आटोपला. दीप्ती शर्माने पाच विकेट्स घेत भारताच्या या विश्वचषक विजयात निर्णाय भूमिका बजावली.



भारतीय महिला अंध संघाने पटकावला टी२० विश्वचषक (२०२५) :


भारतीय महिला अंध संघाने २०२५ चा टी२० विश्वचषकही जिंकला. कोलंबोमधील पी. सारा ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा सात विकेट्सने पराभव केला. ही स्पर्धा पहिल्यांदाच होत होती आणि भारताला ही जागतिक स्पर्धा जिंकण्यात यश आले. भारताने नेपाळला पाच विकेट्सवर ११४ धावांवर रोखले. भारतीय संघाने १२ षटकांत तीन विकेट्स गमावक ११७ धावा करून लक्ष्य गाठले.



सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला (२०२६) :


भारतीय १९ वर्षांखालील संघाने या वर्षाच्या सुरुवातीला सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवून इतिहास रचला. भारत या स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणारा संघ आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, इंग्लंड संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी वैभव सूर्यवंशी अंतिम सामन्याचा स्टार होता. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली. दरम्यान, इंग्लंडकडून कॅलेब फॉकनरने शतक झळकावले, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फॉकनरने ६७ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.



वरिष्ठ पुरुष संघाने टी-२० विजेतेपद कायम राखले (२०२६) :


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत टी-२० विश्वचषक विजेतेपद यशस्वीरित्या राखले आहे. या स्पर्धेत एखाद्या संघाने प्रथमच विजेतेपद राखले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, भारताच्या २५५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला. टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी, २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. सूर्यकुमार यादवचाही जागतिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये आता सामील झाला आहे. अहमदाबादमध्ये २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता टीम इंडियाने इतिहासाची पुनरावृत्ती करत नवा इतिहास रचला आहे.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या