टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने केले हे विक्रम

अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड असा सामना सुरू आहे. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. ही टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारताने आपल्या इनिंगमध्ये तब्बल १८ षटकार आणि १९ चौकार मारले. जेम्स नीशमने संजू, इशान आणि सूर्यकुमार या तिघांना बाद केले तर मॅट हेन्रीने हार्दिकला आणि रचिन रवींद्रने अभिषेकला बाद केले.



संजू सॅमसनचे शतक सलग तिसऱ्या सामन्यात हुकले. फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध आणि सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध तो ८९ धावा करुनच बाद झाला. टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमधील आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. फायनलमध्ये त्याने ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले. अभिषेकला अखेर फायनलमध्ये सूर गवसला. त्याने १८ चेंडूत अर्धशतक केले आणि टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या नॉकआऊटमध्ये सर्वात वेगाने अर्धशतक करण्याची किमया साधली. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकांचा समावेश पॉवरप्लेमध्ये होतो. या पॉवरप्लेमध्ये क्षेत्ररक्षणावर निर्बंध लागू असतात. यामुळे चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे अभिषेकने पॉवरप्लेमध्ये ५१ धावा केल्या. याआधी २०२४ च्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मानेही पॉवरप्लेमध्ये ५१ धावा केल्या होत्या.




  1. संजू सॅमसन - ४६ चेंडूत ८९ धावा, ८ षटकार आणि ५ चौकार

  2. अभिषेक शर्मा - २१ चेंडूत ५२ धावा, ३ षटकार आणि ६ चौकार

  3. इशान किशन - २५ चेंडूत ५४ धावा, ४ षटकार आणि ४ चौकार

  4. हार्दिक पांड्या - १३ चेंडूत १८ धावा, १ षटकार आणि १ चौकार

  5. सूर्यकुमार यादव - एक चेंडू आणि शून्य धावा

  6. तिलक वर्मा - ६ चेंडूत नाबाद ८ धावा

  7. शिवम दुबे - ८ चेंडूत नाबाद २६ धावा, २ षटकार आणि ३ चौकार

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल