Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी ६ 'च्या आठव्या आठवड्यात रुचिताचं एलिमिनेशन; विशाल ओक्साबोक्शी रडला

मुंबई: ' बिग बॉस मराठी ६ 'च्या आठव्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर सुरुवातीला रितेश देशमुख राखी आणि रुचिताला नात्यांचं महत्व सांगतो. तुमच्या नात्याचा गेमवर परिणाम होताना दिसतोय, असं रितेश म्हणतो. रितेश, राखी आणि रुचिताला समजावतो. पॉवर की हातची घालवल्यामुळे रितेश संस्कृतीची शाळा घेतो.संस्कृतीनं बिग बॉसच्या घरात येताना ती सायकॉलॉजी शिकली आहे, असं सांगितलेलं. त्यावरूनही रितेश संस्कृतीला सुनावतो आणि खेळामध्ये सतर्क राहण्याचं आवाहन करतो. पुढे, रितेश रेवाला 'पॉवर की'वरून ही धारेवर धरतो.


रितेश, पॉवर कीबद्दल रुचिताला विचारतो. रुचितासुद्धा गुंडाळण्याचा प्रयत्न करते. विशाल, रुचिताच्या प्लॅनबद्दल सांगतो. रितेश म्हणतो, 'पहिल्यांदा विशाल या आठवड्यात वीक दिसला' पुढे, रितेश कॅप्टन्सी टास्कबद्दल चर्चा करतो. दीपालीनं स्वतःची दोरी सोडून राखीला मदत केलेली असते. त्यावरून रितेश दीपालीला सुनावतो. रितेश संकेतच्या खेळाचं कौतुक करतो.


रितेश सागरला म्हणतो, 'या आठवड्यात तुम्ही करेक्ट मुद्दा पकडला.' उल्टा पुल्टा रूममध्ये विशालच्या बोलण्यावर सागरने प्रतिक्रिया दिलेली असते. त्यावरून रितेश सागरचं कौतुक करतो. पुढे, कॅप्टन्सी टास्कबद्दल बोलताना रितेश रुचिताला म्हणतो, 'तुमचा सगळा गेम विशालच्या डोक्याने दिसतो. बाकी सदस्यांच्या दोऱ्या जमिनीवर होत्या. तर तुमची दोरी विशालच्या हातात होती. विशाल आणि तुमच्यामध्ये जे काही झालं, त्याने तुम्ही पूर्ण डाऊन झालात. पण, विशालच्या बाबतीत तसं झालं नाही. या आठवड्यात विकेस्ट स्पर्धक म्हणून तुम्ही दिसलात' 'विशाल तुम्ही मास्टर माइंड आहात हे सिद्ध केलेलं आहे' असं रितेश विशालला म्हणतो.


पुढे, 'या आठवड्यात पहिले तीन दिवस तुम्ही दिसलात नाहीत' असं रितेश राकेश आणि तन्वीला म्हणतो. विशाल, रुचिताला समजावतो आणि म्हणतो, 'आपण करूया परत गेम अप' विशाल, रुचिताला घट्ट मिठी मारतो.



आठव्या आठवड्यातील एलिमिनेशन



रितेश रुचिता, सागर आणि प्राजक्ता यांना बोलावतो. तिघांपैकी सागर आणि रुचिता डेंजर झोनमध्ये असतात. पुढे, दीपाली, तन्वी आणि प्रभू येतात. तिघांपैकी प्रभू डेंजर झोनमध्ये असतो. संस्कृतीही डेंजर झोनमध्ये असते. घरातील स्पर्धकांना सागर आणि प्रभू दोघांपैकी एक एलिमिनेट झालेत असं वाटतं. पण, प्रभू सेफ असतो. सागर, संस्कृती आणि रुचिता यांच्यापैकी रुचिता एलिमिनेट होते. रुचिताच्या एलिमिनेशनं सगळ्यांना धक्का बसतो. विशाल त्याचं जॅकेट रुचिताला देतो.

Comments
Add Comment

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुनं दिली प्रेमाची कबुली, तुझ्या प्रेमात वेडी झालीये म्हणत केली 'ही' पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिंकू राजगूरू ही सोशल मिडियावर सक्रिय असून

'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे सेक्रेड गेम्स,मँटो आणि ब्लॅक वॉरंट यांसारख्या

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या

प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस

मराठी रंगभूमीवर आता चालणार 'दाभोळकरी पॅटर्न'; 'कॅरी ऑन स्पायगिरी' मधून भरत दाभोळकर यांचा धमाका!

मुंबई: अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे प्रणेते आणि